Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वेक्षण: नोकरदार घटले; पण वेतन वाढले; देशात नोकरीमागे धावणाऱ्यांच्या संख्येत घट, स्वयंरोजगारावर तरुणांचा भर

सर्वेक्षण: नोकरदार घटले; पण वेतन वाढले; देशात नोकरीमागे धावणाऱ्यांच्या संख्येत घट, स्वयंरोजगारावर तरुणांचा भर

वर्ष २०२१-२२ मध्ये नोकरदारांची एकूण संख्या २१.५ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये कमी होत २०.९ टक्के झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 03:33 PM2023-10-14T15:33:09+5:302023-10-14T15:33:33+5:30

वर्ष २०२१-२२ मध्ये नोकरदारांची एकूण संख्या २१.५ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये कमी होत २०.९ टक्के झाली.

Survey Employment down; But wages rose; Reduction in the number of jobseekers in the country, emphasis of youth on self-employment | सर्वेक्षण: नोकरदार घटले; पण वेतन वाढले; देशात नोकरीमागे धावणाऱ्यांच्या संख्येत घट, स्वयंरोजगारावर तरुणांचा भर

सर्वेक्षण: नोकरदार घटले; पण वेतन वाढले; देशात नोकरीमागे धावणाऱ्यांच्या संख्येत घट, स्वयंरोजगारावर तरुणांचा भर

नवी दिल्ली : देशभरातील एकूण श्रमबळापैकी नोकरदारांच्या संख्येत अलीकडे सातत्याने घट होत आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये नोकरदारांची एकूण संख्या २१.५ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये कमी होत २०.९ टक्के झाली. दुसरीकडे, तरुण वर्ग नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळल्याचेही दिसते.  

२०२१-२२ मध्ये स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या ५५.८ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये ५७.३ टक्क्यांवर गेली आहे. तसेच, एकीकडे नोकरी करणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी दुसरीकडे त्यांच्या पगारात मात्र चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या ‘पिरिऑडीक लेबर फोर्स सर्व्हे’ने ही ताजी आकडेवारी जारी केली आहे. 

२०२२-२३ या वर्षात देशातील २१ पैकी १२ राज्यांमध्ये नोकरदारांची संख्या घटली आहे. सर्वाधिक घट आसामात (८.७ टक्के) नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सिक्कीमचा (७.८) क्रमांक लागतो. तथापि, २०२२-२३ मध्ये नोकरदारांच्या पगारात चांगली सरासरी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

Web Title: Survey Employment down; But wages rose; Reduction in the number of jobseekers in the country, emphasis of youth on self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.