Join us

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा टेन्शन होईल दूर, संधी मिळणार भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 8:44 AM

लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सावरतेय; पुढील काही महिने कंपन्यांमध्ये मेगाभरती

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सव्वा वर्षांत अनेकदा कठोर निर्बंध लादले गेले. त्याचा फटका उद्योग जगताला बसला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. मात्र आता नोकरी शोधणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहेत. या वर्षात ६० टक्के कंपन्या भरती प्रक्रिया राबवणार आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. व्हर्च्युअल माध्यमातून मुलाखती घेत अनेक कंपन्यांनी एप्रिल, मे पासूनच भरती प्रक्रिया सुरू केली. आता जुलैपासून भरती प्रक्रिया अधिक वेगानं राबवण्यात येणार आहे.सोने-चांदीच्या दरात झाली घसरण; निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाढले होते भावलॉकडाऊनचा प्रचंड मोठा फटका लॉकडाऊनला बसला. त्यामुळे अनेकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. Mercer Mettl नं याबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. परिस्थिती लवकरच सुधारेल आणि ती कोरोनाचं संकट येण्यापूर्वी जशी होती, तशीच होईल अशी आशा कंपन्यांना आहे. त्यामुळेच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं Mercer Mettlनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.निर्बंध उठत चालल्यामुळे वाहन उद्योग टाकणार ‘गिअर’!, कोरोनाची लाट ओसरण्याच्या मार्गावरजवळपास ६० टक्के कंपन्या नव्या पदांवर कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे क्षमता आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना येत्या काही महिन्यांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एका क्षेत्रातील विशेष प्राविण्य असलेल्या, एखाद्या विशिष्ट कामात नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींसाठी आता चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना नोकरी मिळवणं फारसं अवघड जाणार नाही.Mercer Mettlनं केलेल्या सर्वेक्षणातून एक लक्षणीय बाब समोर आली आहे. एप्रिल, मेमध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन असूनही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली. Mercer Mettlच्या सर्वेक्षणानुसार भविष्यात कंपन्या व्हर्च्युअल हायरिंगला प्राधान्य देतील. लॉकडाऊन काळात जवळपास ८१ टक्के कंपन्या कर्मचारी भरतीसाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल, असं सर्वेक्षण अहवाल सांगतो. 

टॅग्स :नोकरी