Join us  

मुंबईत वास्तव्य, वडील वॉचमन, अर्ध्यावर कॉलेज सोडलं; आज तीन कंपन्यांचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 4:45 PM

Who is Sushil Kumar: सुशील सिंह लहानपणीच कुटुंबासोबत मुंबईत आले. वडीलांनी वॉचमनची नोकरी केली.

मुंबई: आपण अनेक उद्योगपतींची उदाहरणे पाहिली असतील, ज्यांना शिक्षणात अपयश आले, पण उद्योगात चमकदार कामगिरी केली. उत्तर प्रदेशचे सुशील सिंग अशाच काही लोकांपैकी आहेत, ज्यांनी कॉलेज अर्ध्यावर सोडून व्यवसाय सुरू केला आणि आज तीन कंपन्यांचे मालक आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्याचे रहिवासी सुशील सिंह एक कोट्याधीश टेक्नोप्रेन्योर आणि SSR टेकव्हिजन, DBACO आणि Cyva सिस्टम इंकसारख्या यशस्वी कंपन्यांचे मालक आहेत.

विशेष म्हणजे, सुशील यांचा पहिला पगार फक्त 11 हजार रुपये होता, पण आज ते जबरदस्त कमाई करत आहेत. सुशील सिंग यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांचे कुटुंब नोकरीच्या शोधात जौनपूरहून मुंबईत आले. त्यांची आई घर सांभाळायची आणि वडील बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करायचे. डोंबिवलीतील एका चाळीत ते राहायचे.

सुशील यांनी आपले शालेय शिक्षण महानगरपालिकेद्वारे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी चालवल्या जाणाऱ्या हिंदी माध्यमाच्या शाळेतून पूर्ण केले. सुशील यांची दहावीपर्यंतची शैक्षणिक कामगिरी चांगली होती, पण कॉलेजमध्ये त्यांची शैक्षणिक आवड कमी झाली. पहिल्या प्रयत्नात ते 12वी बोर्डाची परीक्षा पास करू शकले नाहीत, दुसऱ्या प्रयत्नात ते उतीर्ण झाले. 

यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवण्यासाठी त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. पण, दुसऱ्याच वर्षात त्यांनी कॉलेज सोडले आणि 2015 मध्ये पॉलिटेक्निक करुन एका कंपनीत टेलिकॉलर आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम सुरू केले. येथे त्यांचा पहिला पगार 11 हजार रुपये होता. 2013 मध्ये सुशीलने सरिता रावतशी लग्न केले आणि लग्नानंतर त्या दोघांनी नोएडामध्ये यूएस स्थित बिझनेस कंपनीच्या सहकार्याने SSR टेकव्हिजनची स्थापना केली. 

यानंतर त्यांनी डिबाको नावाने जागतिक B2C कपड्यांचे ऑनलाइन स्टोअर सुरू केले. त्यांची पत्नी सरिता हा व्यवसाय सांभाळते. यानंतर दोघांनी मिळून 2019 मध्ये तिसरा व्यवसाय Cyva सिस्टम इंक लॉन्च केला. ही एक बहुराष्ट्रीय आयटी सल्लागार कंपनी आहे, जी आयटी कंपन्यांना योग्य उमेदवार नियुक्त करण्यात मदत करते.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसायगुंतवणूकपैसा