मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) ५० लाख रुपये दंड लावण्याच्या एक न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दोन आठवड्यांची स्थगिती दिली.
एनएसईने न्यूज पोर्टलच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात एक न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एनएसईने ५० लाख रुपये दंड भरावा असा निर्णय दिला. एनएसईने आपल्या प्लॅटफॉर्मवर एल्गो कारभाराच्या प्रणालीबद्दल कथित चुकीचा अहवाल प्रसिद्ध केल्याबद्दल पोर्टलच्या विरोधात हा खटला दाखल झाला होता. एम. व्ही. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एनएसईने केलेल्या अपिलावर स्थगितीचा हंगामी आदेश दिला. न्या. गौतम पटेल यांनी ९ सप्टेंबर रोजी एनएसईने केलेल्या अवमान दाव्याची नोटीस फेटाळून लावताना न्यूज पोर्टल चालविणाऱ्या दोघांना प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचा आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल व मसिना हॉस्पिटलला ४७ लाख देण्याचा आदेश एनएसईला दिला होता.
एनएसईला ठोठावलेल्या ५० लाखांच्या दंडास स्थगिती
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) ५० लाख रुपये दंड लावण्याच्या एक न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दोन आठवड्यांची स्थगिती दिली
By admin | Published: September 21, 2015 11:02 PM2015-09-21T23:02:38+5:302015-09-21T23:02:38+5:30