Suzlon Share Price : विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. मंगळवारी बीएसईवर सुझलॉन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ६२.३७ रुपयांवर पोहोचला. रेटिंग अपग्रेडनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. परदेशी ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं सुझलॉन एनर्जीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. मॉर्गन स्टॅनलीनं कंपनीच्या शेअर्सचं रेटिंग ओव्हरवेट केलंय. ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सना इक्वलवेट रेटिंग दिलं होतं.
७१ रुपयांचं टार्गेट
ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं सुझलॉन एनर्जीच्या शेअर्ससाठी ७१ रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं आपल्या नोटमध्ये सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये करेक्शन म्हणजे शेअरहोल्डर्सना कंपनीचा शेअर होल्डिंग वाढवण्याची संधी आहे, असं म्हटलंय. ८६.०४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३८ टक्क्यांची करेक्शन दिसून आली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली, त्यानंतर कंपनीचा प्राइस बँड १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला.
६७० टक्क्यांची तेजी
गेल्या दोन वर्षांत सुझलॉन एनर्जीचा शेअर ६७० टक्क्यांनी वधारलाय. विंड एनर्जी कंपनीचा शेअर १८ नोव्हेंबर २०२२ रोजी ८.१० रुपयांवर होता. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६२.३७ रुपयांवर पोहोचला. तर गेल्या ३ वर्षात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये ८८३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंपनीचा शेअर ६.३४ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ६२.३७ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८६.०४ रुपये आहे. तर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३३.८३ रुपये आहे.
(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)