Lokmat Money > बिझनेस न्यूज > Suzlon Energy shares: आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट

Suzlon Energy shares: आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट

Suzlon Energy shares: कंपनीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी स्तर ६८.२५ रुपयांवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांतील नवी उच्चांकी किंमत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 03:13 PM2024-07-30T15:13:45+5:302024-07-30T15:14:10+5:30

Suzlon Energy shares: कंपनीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी स्तर ६८.२५ रुपयांवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांतील नवी उच्चांकी किंमत आहे.

Suzlon Energy shares Up 23 percent during the week shares beat brokerage s target price Upper Circuit today | Suzlon Energy shares: आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट

Suzlon Energy shares: आठवड्याभरात २३% ची वाढ, शेअरनं ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजलाही मागे टाकलं; आजही अपर सर्किट

Suzlon Energy shares: सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी स्तर ६८.२५ रुपयांवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांतील नवी उच्चांकी किंमत आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी वाढ झाली. शेअर्समधील या तेजीमागे जून तिमाहीचे निकाल आहेत. कंपनीनं जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यापासून सहा ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

काय आहे अधिक माहिती?

२२ जुलै रोजी बाजार बंद झाल्यानंतर सुझलॉननं जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते आणि त्या दिवशीही शेअर १ टक्क्यांनी वधारून बंद झाला होता. मंगळवारी सुझलॉन एनर्जीमध्ये अनेक ब्लॉक डील करण्यात आल्या. या ब्लॉक डील्समध्ये कंपनीच्या २१.९ लाख शेअर्स किंवा ०.४% इक्विटीची देवाणघेवाण झाली आहे, ज्याची किंमत अंदाजे ९० कोटी रुपये असल्याचं सांगितले जात आहे. सरासरी ६८ रुपये प्रति शेअर या दरानं हा व्यवहार झाला.

जून तिमाहीचे निका

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तब्बल ३०२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील १०१ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ २०० टक्के आहे. सुझलॉनचा जून तिमाहीतील महसूल ५० टक्क्यांनी वाढून २,०१६ कोटी रुपयांवर पोहोचलाय. पहिल्या तिमाहीतील डिलिव्हरीदेखील गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक होती.

ब्रोकरेजचं म्हणणं काय?

ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी शेअरच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाल्याचं कारण देत शेअरला बाय ऐवजी आता 'होल्ड' रेटिंग दिलं आहे. या शेअरवरील टार्गेट प्राइस ६९ रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीये. आनंद राठीचे जिगर पटेल यांनी नजीकच्या काळात किमतीत आणखी वाढ होईल आणि तो तो ७५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असं म्हटलंय. तर दुसरीकडे मॉर्गन स्टॅन्लीनं शेअर मात्र ७३.५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'ओव्हरवेट' रेटिंग दिलंय. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Suzlon Energy shares Up 23 percent during the week shares beat brokerage s target price Upper Circuit today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.