Lokmat Money > बिझनेस न्यूज > डॉक्टरांना एसव्हीसी बॅंक देणार मदतीचा हात

डॉक्टरांना एसव्हीसी बॅंक देणार मदतीचा हात

एसव्हीसी बँक (एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) या भारतातील को-ऑपरेटिव्ह बँकांपैकी नावाजलेल्या बँकेनं डॉक्टरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:00 PM2019-01-15T21:00:09+5:302019-01-15T21:19:20+5:30

एसव्हीसी बँक (एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) या भारतातील को-ऑपरेटिव्ह बँकांपैकी नावाजलेल्या बँकेनं डॉक्टरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

SVC Bank help doctor for patient care | डॉक्टरांना एसव्हीसी बॅंक देणार मदतीचा हात

डॉक्टरांना एसव्हीसी बॅंक देणार मदतीचा हात

मुंबई: स्वतःचे क्लिनिक किंवा रुग्णालय असावे, त्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करता यावी, असे प्रत्येक डॉक्टरचे स्वप्न असते. डॉक्टर व त्यांच्या निस्वार्थ सेवेशिवाय जगाची कल्पना करणेच आता अशक्य झाले आहे. त्याच अनुषंगानं डॉक्टरांच्या मदतीसाठी एसव्हीसी बँक (एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड) या भारतातील को-ऑपरेटिव्ह बँकांपैकी नावाजलेल्या बँकेनं पुढाकार घेतला आहे. एसव्हीसी बँक वैद्यकीय व्यावसायिकांसाठी डॉक्टर कर्ज उपलब्ध करून देते.

या कर्जाच्या माध्यमातून आपण एखादं क्लिनिक किंवा रुग्णालयाचीही सुरुवात करू शकतो. एसव्हीसी बँकेचे डॉक्टर कर्ज 5 कोटी रुपयांपर्यंत मिळू शकणार असून, आकर्षक व्याजदरासह 10 वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज देण्यात येणार आहे. एसव्हीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेणूगोपालन म्हणाले, “डॉक्टरांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. बँकेच्या कागदपत्रांसह सर्व प्रक्रिया ही वेळकाढू असल्याने डॉक्टरांना त्याचा फारच त्रास सहन करावा लागतो. डॉक्टरांच्या या गरजा भागवण्यासाठी एसव्हीसी बँकेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. डॉक्टरांच्या वृद्धीसाठी त्यांच्याशी भागीदारी करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचंही अजित वेणुगोपालन यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या मदतीसाठी आम्ही कर्जांची त्वरित मान्यता आणि व्यक्तिगत सेवा देऊ करीत आहोत. डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठ्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना आम्ही वित्तसहाय्य करीत आहोत, असंही एसव्हीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेणूगोपालन म्हणाले आहेत. 

कर्जासाठीच्या पात्रता जाणून घेण्यासाठी कर्ज घेण्याची इच्छा असलेल्यांनी एसव्हीसी बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा अथवा 18003132120 या मोफत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. या व्यतिरिक्त बँकेच्या या www.svcbank.com संकेतस्थळावरही चौकशी करता येणार असून, या चौकशीला बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून थेट प्रतिसाद देण्यात येईल.

Web Title: SVC Bank help doctor for patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक