Lokmat Money > बिझनेस न्यूज > Sweep-in FD: सेव्हिंग अकाऊंटवर FDचं व्याज, पाहा काय आहे आणि कसा घेऊ शकता फायदा

Sweep-in FD: सेव्हिंग अकाऊंटवर FDचं व्याज, पाहा काय आहे आणि कसा घेऊ शकता फायदा

या अंतर्गत, तुम्हाला बचत खात्यातच एफडीचा आनंद मिळेल. पाहा काय आहे नक्की ही सेवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:44 PM2023-08-05T12:44:10+5:302023-08-05T12:44:23+5:30

या अंतर्गत, तुम्हाला बचत खात्यातच एफडीचा आनंद मिळेल. पाहा काय आहे नक्की ही सेवा.

Sweep in FD Fixed deposit interest on savings account see what it is and how you can benefit details investment tips | Sweep-in FD: सेव्हिंग अकाऊंटवर FDचं व्याज, पाहा काय आहे आणि कसा घेऊ शकता फायदा

Sweep-in FD: सेव्हिंग अकाऊंटवर FDचं व्याज, पाहा काय आहे आणि कसा घेऊ शकता फायदा

आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं आहे. असेही अनेक लोक असतात ज्यांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. या बँक खात्यांना सेव्हिंग अकाऊंट  (Savings Bank Account) म्हणतात. यामध्ये लोक त्यांचे पैसे सुरक्षित ठेवतात, ज्यावर बँकेकडून २-३ टक्के व्याज देखील मिळते. पण हे व्याज कमी असून तुम्हाला FD वर ६-७ टक्के व्याज मिळतं हे तुम्ही ऐकलं असेल. 

आता प्रश्न असा आहे की एफडीमध्ये पैसे कसे टाकायचे, गरज असताना अचानक पैसे कसे काढायचे? तुम्हालाही असं वाटत असल्यास, तुम्ही स्वीप-इन एफडीची निवड करू शकता. या अंतर्गत, तुम्हाला बचत खात्यातच एफडीचा आनंद मिळेल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

काय आहे स्वीप इन एफडी?
स्वीप-इन-एफडी ही ऑटो-स्वीप सेवा आहे. या अंतर्गत तुमच्या बचत खात्यात जे काही अतिरिक्त पैसे असतील ते एफडीमध्ये ट्रान्सफर केले जातात. बचत खात्याशी जोडलेली एफडी १-५ वर्षांसाठी असते. आता अतिरिक्त पैसे खात्यात कधी ग्राह्य धरले जाणार आणि पैसे कधी हस्तांतरित होणार, असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी तुम्हाला प्रथम थ्रेशोल्ड लिमिट निश्चित करावी लागेल.

काय असतं थ्रेशोल्ड लिमिट?
बँकेने स्वत: स्वीप थ्रेशोल्ड मर्यादा ठरवायची असते, परंतु खातेदाराला गरजेनुसार कस्टमाईज करण्याचा पर्याय देखील देते. ही मर्यादा अधिक पैसे असल्यास ते आपहूनच एफडी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतील. अशा प्रकारे, तुम्हाला बचत खात्यावरच एफडीचं व्याज मिळू लागेल.

मिनिमम एफडी अमाऊंट
स्वीप-इन-एफडीमध्ये, बँक किमान एफडी रक्कम देखील निश्चित करते. जोपर्यंत थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा रक्कम जास्त होत नाही, तोवर पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत. म्हणजेच, जर तुमची थ्रेशोल्ड मर्यादा २५००० रुपये असेल असेल आणि किमान एफडी अमाऊंट ५००० रुपये असेल, तर तुमच्या बँक खात्यात ३०००० रुपये असतील तरच ५००० रुपये एफडीमध्ये ट्रान्सफर केले जातील.

मॅच्युरिटी पीरिअड किती
मॅच्युरिटी कालावधी देखील बँकेद्वारे निश्चित केला जातो. म्हणजेच त्यापूर्वी तुम्ही एफडीचे पैसे काढू शकत नाही. समजा तुमच्या खात्यातून ५ हजार रुपये एफडीमध्ये गेले आणि तुमचा किमान मॅच्युरिटी कालावधी १५ दिवस असेल, तर तुम्ही ते पैसे १५ दिवसांपूर्वी काढू शकत नाही. जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला १ टक्क्यांपर्यंत दंड लागू शकतो.

Web Title: Sweep in FD Fixed deposit interest on savings account see what it is and how you can benefit details investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.