Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात

१० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात

instamart 10 minute delivery : क्विक कॉमर्सद्वारे १० मिनिटांत लोकं सर्वाधिक कुठली वस्तू ऑर्डर करतात असे तुम्हाला वाटते? जर तुम्ही खाण्यापिण्याचा किंवा औषधांचा विचार करत असाल तर थांबा. स्विगीच्या सीईओने याचा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:18 PM2024-11-15T15:18:01+5:302024-11-15T15:21:55+5:30

instamart 10 minute delivery : क्विक कॉमर्सद्वारे १० मिनिटांत लोकं सर्वाधिक कुठली वस्तू ऑर्डर करतात असे तुम्हाला वाटते? जर तुम्ही खाण्यापिण्याचा किंवा औषधांचा विचार करत असाल तर थांबा. स्विगीच्या सीईओने याचा खुलासा केला आहे.

swiggy ceo revealed truth which is the most searched product on instamart 10 minute delivery | १० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात

१० मिनिटांत लोक सर्वाधिक काय ऑर्डर करतात? स्विगीच्या CEO ने केला खुलासा; कपाळाला लावाल हात

instamart 10 minute delivery : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन दोनचार दिवसांत वस्तू ऑर्डर करण्याचे दिवस गेले. आता क्विक कॉमर्स कंपन्यांचा जमाना आला आहे. ऑर्डर केल्यानंतर १० मिनिटांत वस्तू घरपोहच मिळते. स्विगीचा इन्स्टामार्ट असो किंवा झोमॅटोचा ब्लिंकिट असो. या सर्व कंपन्या १० मिनिटांत वस्तू होम डिलिव्हर करतात. पण, या सेवेत लोक सर्वाधिक गोष्ट कोणती मागवतात माहिती आहे का? स्विगी इंस्टामार्टच्या सीईओने याबाबत खुलासा केला आहे. तुमचाही अंदाज चुकल्याशिवाय राहणार नाही.

CNBC-TV18 ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये स्विगी इंस्टामार्टचे सीईओ श्रीहर्ष मॅजेती सहभागी झाले होते. यावेळी इंस्टामार्टवर लोक सर्वाधिक बेडशीट ऑर्डर करतात, असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसले का? असं वक्तव्य मॅजेती यांनी केलं. पण, आमच्या प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट डिलिव्हरीसाठी बहुतेक बेडशीट ऑर्डर केल्या जातात हे खरे आहे. पूर्वी लोक सर्वाधिक बॅटरी ऑर्डर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

१० मिनिटांत डिलिव्हरीसाठी स्पर्धा
लोक १० मिनिटांत सर्वाधिक बेडशीट ऑर्डर करतात हे एकून विचित्र वाटलं असेल. पण, आता ऑर्डर येत आहेत, म्हटल्यावर लोकांना गरज वाटत असेल, असंही ते म्हणाले. क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्समधील रेषा आता पुसट होत चालली आहे. इतर ई-कॉमर्स कंपन्याही आता वेगवान डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची कंपनी सर्वत्र असू शकत नाही. परंतु, इतर खेळाडूही या क्षेत्रात उडी घेत असून क्विक कॉमर्स क्षेत्रात स्पर्धा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहेत आव्हाने?
सर्वांना सोबत घेऊन चालणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. जसजसे आपण प्रगती करत गेलो तसतसे ते अधिक कठीण होत गेले. लोकांना बरोबर घेऊन चालणे हे आज यशाचे रहस्य बनले आहे. हे प्रत्येकवेळी सोपे नसते. पण, कंपनी जसजशी वाढत जाते, तसतसा तो पाया बनतो, असंही सीईओ श्रीहर्ष मॅजेती म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा स्विगी लाँच झाली, तेव्हा बाजारात १९ पेक्षा जास्त प्लेअर्स होते. आज क्विक कॉमर्सची बाजारपेठ ५.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ५० हजार कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. सुरुवातीला याचा वापर किराणा सामानाच्या वितरणासाठी केला जात होता, ज्याचा विस्तार आता इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, क्रीडा उपकरणांपर्यंत झाला आहे.

Web Title: swiggy ceo revealed truth which is the most searched product on instamart 10 minute delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.