Lokmat Money > बिझनेस न्यूज > ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

Swiggy IPO Update : ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आपटल्याने आता स्विगी कंपनी सावधी झाली आहे. आपला आयपीओ लाँच करण्यासाठी स्विगी नवीन रणनिती आखत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:12 AM2024-10-25T10:12:36+5:302024-10-25T10:13:32+5:30

Swiggy IPO Update : ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आपटल्याने आता स्विगी कंपनी सावधी झाली आहे. आपला आयपीओ लाँच करण्यासाठी स्विगी नवीन रणनिती आखत आहे.

swiggy cuts valuation target for ipo amid hyundai motor india ipo flop show | ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

Swiggy IPO : देशातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन आलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाची (Hyundai Motor India) बाजाराने चांगलीच निराशा केली. गेल्या एक महिन्यापासून शेअर बाजारात सुरू असलेल्या गोंधळानंतर आयपीओ लॉन्च करणाऱ्या कंपन्या आता सावध झाल्या आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने यातून धडा घेऊन आता आपली रणनिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगीने IPO मधील कंपनीचे मूल्यांकन १०-१६ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्विगी नोव्हेंबर २०२४ मध्ये IPO लाँच करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी, कंपनीने IPO द्वारे १५ अब्ज डॉलरचे मूल्यांकन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, आता कंपनीने १२.५-१३.५ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्विगी आयपीओद्वारे १.४ अब्ज उभारण्याची तयारी करत आहे. या वर्षी ह्युंदाई मोटर इंडियाच्या IPO नंतर भारतीय शेअर बाजारात दुसरा सर्वात मोठा IPO असेल.

बाजारात विक्रीचा दबाव
गेल्या महिनाभरापासून शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. एकट्या ऑक्टोबर २०२४ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ९०,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. अशात ह्युंदाई मोटर इंडियाच्या खराब लिस्टींगमुळे स्वीगीला आपली किंमत कमी करण्यास भाग पडले आहे. गुंतवणूकदारांना आयपीओ लिस्टींगमध्ये चांगला परतावा मिळेल, अशी पद्धतीने आता स्विगी कंपनीचे मूल्यांकन ठरवत आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने त्यांच्या आयपीओमध्ये १९६० रुपयाची इश्यू किंमत निश्चित केली होती. मात्र, लिस्टिंगच्या दिवशी शेअर्स ७.२ टक्क्यांच्या घसरणीसह १८२० वर बंद झाला.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक एक्स्चेंजवर स्वीगीची लिस्टिंग होऊ शकते. कंपनी त्याआधीच्या आठवड्यात आपला आयपीओ लॉन्च करेल. सप्टेंबर २०२४ च्या शेवटी, शेअर बाजार नियामक सेबीने स्विगीला त्यांचे निरीक्षण पत्र जारी केले होते. स्विगी इंडियाने एप्रिल २०२४ मध्ये आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीकडे ड्रॉफ्ट पेपर दाखल केली होती. कंपनीने रेग्युलेटरकडे अद्ययावत ड्रॉफ्ट पेपर देखील दाखल केला होता, त्यानुसार कंपनी फ्रेश इश्यूद्वारे म्हणजे नवीन शेअर्स जारी करून ३७५० कोटी रुपये उभारेल आणि ऑफर फॉर सेलद्वारे ६००० कोटी रुपये उभारण्याची योजना देखील आहे.

Web Title: swiggy cuts valuation target for ipo amid hyundai motor india ipo flop show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.