ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीबद्दल (Swiggy) तुम्ही ऐकलंच असेल. स्विगीनं नुसतं जेवणच नाही, तर काही रेस्तराँच्या मालकांना कर्जही दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या कॅपिटल असिस्ट प्रोग्राम अंतर्गत त्यांनी ८००० पेक्षा अधिक रेस्तराँ मालकांना ४५० कोटींपेक्षा अधिक कर्ज दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. स्विगीनंच मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. कॅपिटल असिस्ट प्रोग्राम २०१७ मध्ये लाँच करण्यात आला आहे. रेस्तराँ मालकांना मदत व्हावी या उद्देशानं हा प्रोग्राम डिझाइन करण्यात आलाय. आतापर्यंत ८ हजारांपेक्षा अधिक रेस्तराँ मालकांना कर्ज देण्यात आले असून त्यापैकी ३ हजार जणांना २०२२ मध्ये कर्ज देण्यात आल्याची माहिती स्विगीनं एका निवेदनाद्वारे दिली आहे.
इंडिफी, इनक्रेड, एफटी कॅश, पेयू फायनान्स आणि आयआयएफएलसह अनेक कर्ज देणार्या भागीदारांसोबत भागीदारी करून, स्विगी टर्म लोन आणि क्रेडिट लाइन यासारखे आर्थिक पर्याय ऑफर करते. "एनबीएफसी लवकरच प्रीअप्रुव्ह्ड लोनसारखी सुविधा देईल. जेणेकरून आमच्या भागीदारांना सहजरित्या कर्ज उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणखी वाढ होईल," अशी प्रतिक्रिया स्विगीच्या स्वप्निल बाजपेयी यांनी दिली.
क्विक साइन-अप पासून जलद मंजुरीपर्यंत, कॅपिटल असिस्ट प्रोग्रामद्वारे, NBFCs रेस्टॉरंट भागीदाराच्या व्यावसायिक गरजांसाठी निधी सोप्या रितीनं निधी उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आम्ही आतापर्यंत फायनान्सिंगच्या तीन राऊंड्स केल्या आहेत आणि फंडचा उपयोग खेळत्या भांडवलाच्या गरजा पुरवण्यासाठी केलाय. अर्ज करण्यापासून ते फंड मिळवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही त्वरित होणारी आणि पारदर्शी असल्याचं मत आर्टिनसी इंडल्ज गिल्ट फ्रीचे मालक आरती आणि सुमित रस्तोगी यांनी व्यक्त केलं.
केवळ जेवणच नाही, तर लोनही देऊ लागलंय Swiggy; ४५० कोटींपेक्षा अधिकचं दिलंय कर्ज, जाणून घ्या
८ हजारांपेक्षा अधिक जणांना स्विगीनं कर्जाची सुविधा पुरवली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:47 AM2023-10-04T10:47:46+5:302023-10-04T10:47:58+5:30