भारतात कोरोनानं थैमान घातलेलं असून, लोकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असंही सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लोकांना ऑनलाइन डिलीव्हरी ऍप(Online Shopping)चा चांगला उपयोग होतोय. लोक घरी बसून ऑर्डर करू शकतात आणि अन्नधान्य, भाजीपाला ते आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोचतात. आज यात आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने आता अवघ्या 45 मिनिटांत रेशनची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट(Swiggy Instamart) असे ठेवले आहे.
सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत रेशन मागवू शकतो
ऑनलाइन शॉपिंग आणि होम डिलिव्हरी पाहता स्विगीनेही या विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सेगमेंटमध्ये स्विगी फ्लिपकार्ट क्विक, बिग बास्केट, डुन्झो, ग्रोफर्सशी स्पर्धा करणार आहे. स्विगीच्या म्हणण्यानुसार ऑर्डर मिळाल्यानंतर 30-45 मिनिटांत वस्तूंची होम डिलिव्हरी केली जाईल. ही सुविधा सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत उपलब्ध असेल. स्नॅक्स, आइस्क्रीम, इन्स्टंट जेवण, फळ-भाज्या, किराणा वस्तू ऑर्डर स्विगी इन्स्टामार्ट सेवेद्वारे देता येतात.
डार्क स्टोअरच्या 2500हून अधिक वस्तू वितरीत केल्या जातील
डार्क स्टोअर्सद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे. त्यात 2,500 हून अधिक वस्तू उपलब्ध असतील. स्विगी आक्रमकपणे या विभागात जाण्याची तयारी करत आहे. व्हर्च्युअल स्टोअरच्या भागीदारीत स्विगीने ही सेवा सुरू केली आहे. सध्या गुरुग्राममध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा बंगळुरुमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्विगी यांनी सांगितले. कोरोना संकटामुळे स्विगीच्या अन्न वितरण व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. किराणा डिलिव्हरीवर आता कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे.
45 मिनिटांत घराघरात पोहोचणार रेशनिंगचं सामान, Swiggyकडून नव्या सुविधेला सुरुवात
कंपनीने आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट(Swiggy Instamart) असे ठेवले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:37 PM2020-08-10T19:37:38+5:302020-08-10T19:37:51+5:30