Lokmat Money > बिझनेस न्यूज > Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी

Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी

Swiggy IPO Listing: स्विगीचे शेअर्स ग्रे मार्केटनुसार फ्लॅट एन्ट्री घेतील अशी चिन्हं दिसत होती. परंतु आज स्विगीचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. मात्र नंतर त्यात घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:27 AM2024-11-13T10:27:32+5:302024-11-13T10:27:32+5:30

Swiggy IPO Listing: स्विगीचे शेअर्स ग्रे मार्केटनुसार फ्लॅट एन्ट्री घेतील अशी चिन्हं दिसत होती. परंतु आज स्विगीचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. मात्र नंतर त्यात घसरण दिसून आली.

Swiggy IPO Listing rs 390 share listed at rs 420 Here too the company lags behind Zomato share price | Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी

Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी

Swiggy IPO Listing: स्विगीचे शेअर्स ग्रे मार्केटनुसार फ्लॅट एन्ट्री घेतील अशी चिन्हं दिसत होती. परंतु आज स्विगीचे शेअर्स (Swiggy Share Price) ७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या शेअर्सच्या (Zomato Share Price) तुलनेत ५१ टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले होते.

स्विगीच्या आयपीओलाही संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी असलेला राखीव भाग पूर्णपणे भरला गेला नाही. हा आयपीओ एकूण ३ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत ३९० रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले. दरम्यान, आज ते बीएसईवर ४१२ रुपये आणि एनएसईवर ४२० रुपयांवर पोहोचले, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना सुमारे ७ टक्के लिस्टिंग नफा मिळाला.

मात्र, शेअर्स घसरल्याने आयपीओ गुंतवणूकदारांचा आनंद अल्पावधीतच मावळला. बीएसईवर तो ३९५.३५ रुपयांवर (Swiggy Share Price) घसरला, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना १.३७ टक्क्यांचा नफा झाला. प्रत्येक शेअर २५ रुपयांच्या सवलतीत मिळाल्याने कर्मचारी अधिक नफ्यात आहेत.

किती मिळालेलं सबस्क्रिप्शन?

देशातील दुसऱ्या क्रमांकाची ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी कंपनी असूनही त्याला गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. बहुतांश इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं या आयपीओमध्ये रस दाखवला आहे. ११३२७ कोटी रुपयांचा आयपीओ बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता, तर सब्सक्रिप्शन ८ नोव्हेंबर रोजी बंद झालं.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, सब्सक्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरपर्यंत आयपीओ ३.५९ पट सब्सक्राइब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ६.०२ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा हिस्सा १.१४ पट सब्सक्राइब झाला होता. तर दुसरीकडे एकूण सबस्क्रिप्शनचा ४१ टक्के हिस्सा नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणीत आणि १.६५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत सबस्क्राईब झाला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Swiggy IPO Listing rs 390 share listed at rs 420 Here too the company lags behind Zomato share price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.