Swiggy Share Market Listing plan : झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीचं शेअर बाजारात यापूर्वीच लिस्टिंग झालंय. आता त्यांची स्पर्धक कंपनी स्विगीशेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या मूल्यांकनासाठी आठ बँकांसोबत चर्चा करत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2024 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दुसरीकडे या वर्षात आतापर्यंत झोमॅटोच्या शेअर्समध्ये 54.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्विगीनं लिस्ट होण्याची प्रक्रिया वेगवान केलीये.
या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितलं सॉफ्टबँकचं समर्थन असलेली स्विगी 2024 च्या स्टॉक मार्केट लिस्टिंगवर लक्ष ठेवून आहे. कमकुवत बाजारामुळे अनेक महिने प्रक्रिया थांबवल्यानंतर स्विगीनं आपल्या मूल्यांकनाला रिव्ह्यू करण्यासाठी बँकर्सशी बोलणी सुरू केली आहेत. 2022 मध्ये अखेरच्या फंड रेझिंगदरम्यान स्विगीचं मूल्यांकन 10.7 अब्ज डॉलर्स होतं. परंतु, फंडिंगची कमतरता आणि वाढत्या मूल्यांकनाच्या बाबतीतील गुंतवणूकदारांच्या चिंतेदरम्यान आपला आयपीओ आणण्याची योजना थांबवली होती.
पुढील वर्षी लिस्टिंग?अलीकडच्या काळात जागतिक आणि भारतीय बाजारात तेजी आल्यानंतर स्विगीनं आयपीओवर काम सुरू केलं आहे. यासाठी सप्टेंबरच्या सुरुवातीला ८ गुंतवणूक बँकांना आमंत्रित करून त्यांनी आपली आयपीओची योजना पुन्हा सुरू केली. रिपोर्ट्सनुसार, गुंतवणूक बँकर्समध्ये मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन आणि बँक ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे. जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान शेअर बाजारात लिस्ट होण्याचा स्विगीचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.