Lokmat Money > बिझनेस न्यूज > Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स

Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स

Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता हा आयपीओ कधी येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:52 AM2024-10-28T11:52:09+5:302024-10-28T11:52:09+5:30

Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता हा आयपीओ कधी येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Swiggy s IPO likely to be open for investment from 6 November diwali season check details ipo size | Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स

Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स

Swiggy IPO : स्विगीच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता हा आयपीओ कधी येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्विगीचा आयपीओ पुढील महिन्यात ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान येऊ शकतो. अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ ५ नोव्हेंबर रोजी खुला होण्याची शक्यता आहे. या आयपीओची साईज ११,७०० कोटींची असू शकते. यामध्ये ३७५० कोटी रुपयांचे नवे शेअर्स आणि १८.५३ कोटी शेअर्सच्या ओएफएसचा समावेश आहे.

व्हॅल्यूएशन केलं कमी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या इश्यू कंपोनंटला ४,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे. कंपनीनं १५ अब्ज डॉलरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आता ११.३ अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांना खराब आयपीओ नकोय. विशेष म्हणजे स्विगीची प्रतिस्पर्धी झोमॅटोनं नुकतीच निव्वळ नफ्यात ३८९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. झोमॅटो ८,५०० कोटी रुपये उभारण्यासाठी क्यूआयपी (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट) घेऊन येत आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत झोमॅटोनं १७६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय.

स्विगीच्या महसूलात वाढ

गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०२३ ते २०२४ या कालावधीत स्विगीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून, आर्थिक वर्ष २०२३ मधील ८,७१४.४५ कोटी रुपयांवरून तो आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ११,६३४.३५ कोटी रुपये झाला. कंपनीचा तोटाही आर्थिक वर्ष २०२३ मधील ४,१७९.३१ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २,३५०.२४ कोटी रुपयांवर आलाय. स्विगीची प्रतिस्पर्धी झोमॅटोनं जुलै २०२१ मध्ये ९,३७५ कोटी रुपयांची ऑफर जाहीर केली होती. सध्या कंपनीचा शेअर २५०.९५ रुपयांवर व्यवहार करत आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १३८.४८ टक्क्यांनी अधिक आहे. 

स्विगीच्या काही प्रमुख विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्टबँकचा ८% हिस्सा आहे आणि एक्सेलचा कंपनीत ६% हिस्सा आहे. विशेष म्हणजे स्विगीच्या आयपीओला बाजार नियामक सेबीने मंजुरी दिली आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Swiggy s IPO likely to be open for investment from 6 November diwali season check details ipo size

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.