Join us

Swiggy चा मोठा निर्णय; ५ शहरात बंद केली 'ही' खास सर्व्हिस 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:04 PM

Swiggy Supr Daily Service : स्विगीने (Swiggy) 10 मे पासूनच सुपर डेली सर्व्हिसद्वारे नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. 11 आणि 12 मे रोजी जुन्या ऑर्डर स्विगीद्वारे वितरित केल्या जातील.

नवी दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने  (Online food Delievery Company Swiggy) एक खास सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगीने (Swiggy) सध्या ही सर्व्हिस पाच मोठ्या शहरांमध्ये बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाचा दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अडचण निर्माण होऊ शकते. 

स्विगीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबादमध्ये सुपर डेली (Supr Daily) सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये आता १२ मे पासून ग्राहकांना सुपर डेली सर्व्हिसद्वारे सामान डिलिव्हरी केली जाणार आहे. दरम्यान, कंपनीने याऐवजी इंस्टा मार्ट (Insta Mart) सुरू केले आहे, असे सांगितले जात आहे. 

10 मे पासून ऑर्डर घेणे बंदस्विगीने (Swiggy) 10 मे पासूनच सुपर डेली सर्व्हिसद्वारे नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. 11 आणि 12 मे रोजी जुन्या ऑर्डर स्विगीद्वारे वितरित केल्या जातील. जर ग्राहकाच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक असतील तर ते 5-7 कामकाजाच्या दिवसांत खात्यात परत केले जातील. यासंदर्भात कंपनीच्या वतीने ग्राहकांना मेल करण्यात आले आहेत. कंपनीची ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू राहणार आहे. या सर्व्हिसचा याठिकाणी विस्तार करण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे.

काय आहे सुपर डेली सर्व्हिस?स्विगीच्या (Swiggy) सुपर डेली सर्व्हिसद्वारे दूध, ग्रॉसरीशिवाय दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंची होम डिलिव्हरी केली जाते. याअंतर्गत सुविधा मिळवण्यासाठी ग्राहकांना सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. स्विगी मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्राहक डेली सामान कार्टमध्ये टाकू शकतात. दररोज सकाळी हे सामान आपल्या घरात पोहोचले जाऊ शकते. 

टॅग्स :स्विगीव्यवसाय