Symphony Ltd Share : गुरुवारी( 8 ऑगस्ट ) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 582 अंकांनी घसरुन 78,886 वर बंद झाला, तर निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह 24,117 वर बंद झाला. अशा परिस्थितीत एअर कूलर बनवणाऱ्या प्रसिद्ध कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स गुरुवारी 17 टक्क्यांनी वधारले. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत या शेअरने 42 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली आहे.
लोकप्रिय एअर कूलर कंपनी Symphony च्या शेअर्समध्ये जून तिमाहीच्या निकालानंतर ही वाढ झाली आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. सिम्फनीने व्यवसायात मागील काही वर्षात 118 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळेच या स्टॉकमध्ये खूप वाढ झाली आहे.
स्टॉकची कामगिरीगुरुवारी सिम्फनीचा शेअर 16.71 टक्क्यांनी वाढून 1,747.65 रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन सत्रांमध्ये शेअर 42 टक्क्यांनी वाढला आहे. तर, सहा महिन्यांत या शेअरने 80 टक्के आणि एका वर्षात 95 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)