Join us

Lockdown : निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर Telecom कंपन्यांना टॉवर सुरू ठेवण्यात होतेय अडचण, दिलासा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 1:22 PM

देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टॉवरच्या साईट्सवर जाण्यासाठी ई-पास देण्याची TAIPAची मागणी

ठळक मुद्देदेखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टॉवरच्या साईट्सवर जाण्यासाठी ई-पास देण्याची TAIPAची मागणीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी घालण्यात आलेत निर्बंध

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. याचा दूरसंचार क्षेत्रालाही मोठा फटका बसताना दिसत आहे. देशातील विविध भागातील लॉकडाऊनमुळे दूरसंचार कंपन्यांना आपले टॉवर्स सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर दूरसंचार कंपन्यांच्या संघटना TAIPA ने केंद्र सरकारला पत्र पाठवून मदत मागितली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार कंपन्यांना डिझेलची कमतरता, टॉवरची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये जा यासाठी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन TAIPA नं दूरसंचार विभागाला पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, टॉवरची देखभाल करणाऱ्या लोकांना साईट्सवर जाण्यासाठी ई पास देण्यात यावे अशी मागणी TAIPA नं केली आहे. तर पेट्रोलियम कंपन्यांनीही वेळेवर त्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय टॉवरला पुरवला जाणारा वीज पुरवठा खंडित होऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. टॉवरच्या देखभालीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विषयही चितेचा आहे. कंपन्यांनांना सिलिंगवरही दिलासा द्यावा, तसंच जेवढे टॉवर स्थानिक प्रशासनानं सील केले आहेत ते उघडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतमोबाइल