देशातील सर्वात मोठा टाटा ग्रुप आता उत्तर प्रदेशातील अयोध्येत हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. आता ताज ग्रुपचे अयोध्येतही पंचतारांकित हॉटेल बांधले जाणार आहे. ताज ग्रुप अयोध्येत एक नव्हे तर तीन पंचतारांकित हॉटेल्स बांधणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करत आहेत.
अलीकडेच ताज ग्रुपने यासंदर्भात घोषणा केली आहे. ताज ग्रुपने सांगितले की, लवकरच अयोध्येत पंचतारांकित हॉटेल बांधणार आहेत. यामध्ये 100 खोल्या असलेले अपस्केल विवांता आणि 120 खोल्या असलेले लीन लक्स जिंजर हॉटेल 2027 पर्यंत उघडले जातील. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचे कामही पुढील वर्षी पूर्ण होईल.
जानेवारी 2024 पासून मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही या वर्षी जूनमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योजनेत आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी अयोध्येत पंचतारांकित हॉटेल्स बांधली जात आहेत. टाटा समूह अयोध्येत 3 पंचतारांकित हॉटेल्स बांधणार आहे. ज्याचे काम वेगाने सुरू असून ते 2027 पर्यंत तयार होईल.
विवंता आणि जिंजर ब्रँडेड हॉटेल्स असतील
मंदिर बांधल्यानंतर अयोध्येत भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढू शकते. अशा स्थितीत या हॉटेल्सचे काम वेगाने सुरू आहे. IHCl ने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, विवंता आणि जिंजर हॉटेल्स ही अयोध्येतील पहिली ब्रँडेड हॉटेल्स असतील. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची मोठी सोय होणार आहे. बनारसनंतर अयोध्या हे असे धार्मिक शहर आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक येतात.