अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीअंतर्गत सप्टेंबर महिन्याचे रिटर्न दाखल करण्यापूर्वी करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सप्टेंबर हा वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत एक महत्त्वाचा महिना असून, करदात्याने खालील गोष्टींचे पालन करावे :
१. इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ : आर्थिक वर्ष २०२०-२१ शी संबंधित कोणत्याही इनव्हॉइस/डेबिट नोटसंदर्भात आयटीसी करदात्याने टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला नसेल तर सप्टेंबर २१ च्या रिटर्नमध्ये त्याचा आयटीसी घेतला पाहिजे.
२. रिकन्सीलियेशन : सप्टेंबर महिन्याचे रिटर्न दाखल करण्यापूर्वी जीएसटीआर २ए/२बीमध्ये दिसणारे; पण खरेदी रजिस्टरमध्ये न नोंदवलेले इनपूट टॅक्स क्रेडिट ओळखले गेले पाहिजे किंवा इनपूट टॅक्स क्रेडिट खरेदी रजिस्टरमध्ये घेतले असेल; परंतु जीएसटीआर२ए/२बीमध्ये प्रतिबिंबित झाले नसेल तर त्याची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी.
३. आयटीसीचे विभाजन : जर करदाता हा करपात्र पुरवठा आणि टॅक्स फ्री पुरवठा यात गुंतलेला असेल तर जीएसटीआर-३ बी दाखल करताना नियम ४२ आणि ४३ अंतर्गत एकूण उलाढालीच्या टॅक्स फ्री पुरवठा प्रमाणात प्राप्त केलेले इनपूट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करणे आवश्यक आहे.
४. जर करदात्याने खरेदी पुरवठ्यावर इनपूट टॅक्स घेतला असेल; परंतु पुरवठादाराला पैसे दिले नसतील, तर न दिलेली रक्कम आणि इनपूट टॅक्स क्रेडिटच्या रकमेच्या प्रमाणात घेतलेले इनपूट टॅक्स क्रेडिट इनव्हॉइसच्या तारखेपासून १८० दिवसांच्या कालावधीनंतर रिव्हर्स करणे आवश्यक आहे.
अर्जुन : विक्रीसंबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
कृष्ण : १. २०२०-२१ साठीच्या जीएसटीआर-3बी आणि पुस्तकांचे रिकन्सीलियेशन केले पाहिजे. करदात्याने विक्रीचा हिशोब पुस्तकांशी आणि दाखल केलेल्या जीएसटीआर-३बी शी केला पाहिजे.
२. विक्रीसंबंधी दुरुस्ती सप्टेंबर २१ मध्ये केली जाऊ शकते. उदा. जर बी२बी पुरवठा (विक्री) बी२सी म्हणून नोंदवला गेला असेल तर सप्टेंबर २१ रिटर्नमध्ये त्यात सुधारणा केली जाऊ शकते.
- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउण्टण्ट