Join us

भाडेकरारावरील वस्तू असे वाचवतील पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 8:18 PM

वाढते इंधन दर, वाढत्या महागाईमुळे प्रत्येकालाच रोख पैशांची गरज भासते. यामुळे आम्ही आपल्याला पैसे वाचविण्याच्या काही टीप्स सांगत आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही वस्तू भाडेकरारावर वापरून पैसे वाचवू शकता. 

प्रत्येकाच्या घरात किंवा नातेवाईकांकडे लग्नसमारंभ असतो. यावेळी कपडे, इमिटेशन ज्वेलरी विकत घेण्याऐवजी ती भाड्याने घेतल्यास बरेच पैसे वाचतात. यासाठी Flyrobe, Rent It Bae, Liberent सारख्या वेबसाईटही आहेत. पहा गणित कसे ते. एका डिझायनर ड्रेसची किंमत 10 हजार रुपये आहे. तोच जर भाड्याने घेतल्यास 1500 रुपयांना मिळणार आहे. याद्वारे तुम्ही 8500 रुपये वाचवाल.

रोज ऑफिसला जाण्यासाठी होणाऱ्या खर्चातही बचत होऊ शकते. खासगी कार वापरण्याऐवजी ओला, उबरची कार शेअरिंग सेवा वापरल्यास इंधन खर्च, मेन्टेनन्सही वाचू शकणार आहे. जर एखादी कार 20 किमीसाठी 220 रुपयांचे इंधन जाळत असेल तर शेअर कॅब केल्याने 140 रुपये द्यावे लागतील. कामाच्या 23 दिवसांमध्ये तुम्ही 1840 रुपये वाचवू शकाल. 

प्रवासावेळी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी Airbnb, Tripadvisor and homestays.com सारख्या वेबसाईटवरून खासगी खोल्या वापरायला देणाऱ्यांकडे राहू शकता. एखाद्या थ्री स्टार हॉटेलचे भाडे 2500 रुपये असेल तर त्याच भागातील अन्य रुमचे भाडे 1000 ते 1500 रुपयांपर्यंत पडू शकते. 

स्टार्टअप किंवा एखादा कमी जागा लागणारा व्यवसाय असेल तर कामाची जागा शेअर करून भाड्याचे पैसे वाचवू शकता. Wework, Awfis, Innov8 या वेबसाईटवर अन्य कामे करणारे भेटू शकतात. 

नोकरीनिमित्त वारंवार शहर बदलावे लागणाऱ्यांना फर्निचर खरेदी आणि विक्री करणे तापदायक ठरते. यामध्ये पैसेही वाया जातात. यामुळे Rentomojo and Furlenco सारख्या कंपन्या फर्निचर भाड्याने पुरवितात.

टॅग्स :पैसामहागाईकर्मचारी