Join us

Loan: कर्ज घेताय? या गोष्टी लक्षात ठेवाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:43 PM

Loan: गृहकर्ज खरेदी करण्यापूर्वी, फक्त व्याजदर आणि त्यासाठी तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल, हे जाणून घेणे पुरेसे नाही. गृहकर्ज परतफेड प्रक्रियेस बराच वेळ लागतो, त्यामुळे गृहकर्ज घेताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक ठरते.

गृहकर्ज खरेदी करण्यापूर्वी, फक्त व्याजदर आणि त्यासाठी तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल, हे जाणून घेणे पुरेसे नाही. गृहकर्ज परतफेड प्रक्रियेस बराच वेळ लागतो, त्यामुळे गृहकर्ज घेताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक ठरते. 

बँका काय तपासतात...बँका सामान्यत: कर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, परतफेडीची क्षमता यासह इतर अनेक बाबी लक्षात घेऊन गृहकर्ज मंजूर करतात. तुम्ही बँकांनी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता न केल्यास तुमचा गृहकर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो.

किती कर्ज घ्यावे?बँका कर्ज देताना अर्जदार परतफेड करू शकतात का? याचाही विचार करतात. तुम्ही तुमची गरज किती आहे, ईएमआय किती देऊ शकता याचा विचार करून कर्ज घ्या. तुमचा ईएमआय तुमच्या पगाराच्या ४० टक्केपेक्षा जास्त नसावा.

जास्त डाऊन पेमेंट करण्याचे फायदेजास्त डाऊन पेमेंट क्रेडिट रिस्क कमी करते. त्यामुळे कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. ज्या कर्जदारांना त्यांचे व्याज खर्च कमी करून हवे आहे, त्यांनी गृहकर्जाच्या डाऊन पेमेंटसाठी अधिक रक्कम भरावी.

क्रेडिट स्कोअर वाढवाकर्ज घेण्यापूर्वी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर पाहतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. त्यामुळे, जर तुम्ही भविष्यात गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.

६ महिन्यांचे ईएमआय राखून ठेवाकाही वेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर परिस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. दंड आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्येही घट होऊ शकते. त्यामुळे, तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये किमान सहा महिन्यांसाठी अंदाजे गृहकर्जाचे ईएमआयचे हप्ते शिल्लक ठेवा.

बँकांच्या ऑफरची तुलना करागृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, कर्जदारांनी बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून दिलेल्या वैशिष्ट्यांच्या ऑफरची तुलना नक्की करावी.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र