आपल्याकडे सोनं, चांदी, महत्वाची कागदपत्र ठेवण्यासाठी बँकेतील लॉकरचा वापर केला जातो. सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. चोरी होण्याच्या भितीमुळे याचा वापर केला जातो. पण, बँक लॉकर घ्यायचे असेल तर बँकांचे काही नियम असतात. बँकांनी काही चार्जेस लावलेले असतात, या नियमांमध्ये रिझर्व्ह बँक नेहमी बदल करत असते. आरबीआयने आता या नियमातच आणखी काही बदल केले आहेत.
गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण?
तुम्हाला बँक लॉकर घ्यायचे असेल किंवा तुमच्याकडे असेल तर आज आम्ही तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन अपडेटबद्दल सांगणार आहोत. आरबीआयने काही दिवसापूर्वीच बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल करत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरबीआयने लॉकरचे नूतनीकरण करण्याबाबतची प्रक्रिया सांगितली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुधारित करारावर सही करावी लागेल आणि ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करावे लागेल.
बँक लॉकर फक्त काही खातेदारांनाच मिळत असते. ज्यांचे बँकेत बचत खाते किंवा चालू खाते आहे त्यांनाच लॉकरची सुविधा मिळते. जर ग्राहकाला बँक लॉकर उघडायचे असेल तर फक्त पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय पत्त्याचा पुरावाही द्यावा लागतो.
लॉकर घेण्यासाठी बँक आणि ग्राहक यांच्यात करार आहे. या करारांवर स्वाक्षरी केल्यानंतरच लॉकर दिले जाते. लॉकरची साईज किली असेल हे ग्राहकावर असते. बँक लॉकर्स सिंगल-टायर्ड किंवा मल्टी-टायर्ड असतात.
लॉकर उघडल्यावर बँक विशिष्ट क्रमांकाची चावी ग्राहकाला देते आणि त्याची मास्टर की स्वतःकडे ठेवते. लॉकरवर किती भाडे आकारले जाईल, हे लॉकरचा आकार आणि बँकेच्या ठिकाणाच्या आधारे ठरवले जाते. मात्र, लॉकर उघडताच बँक ग्राहकाकडून सुरक्षा ठेव घेते. ही ठेव मुदत ठेव किंवा रोख रकमेत जमा करता येते.