नवी दिल्ली : जर तुम्ही गृहकर्जावर (Home Loan) मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कर्ज आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रक्रियांची पूर्ण माहिती असली पाहिजे. गृहकर्ज घेताना सर्व बाबी आधीच जाणून घेतल्या पाहिजेत. कर्जावर घर घेण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे, हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल. यामुळे तुमच्या बजेटचा अंदाज लावणे सोपे होईल. गृहकर्जासाठी बरीच कागदपत्रे गरजेची आहेत. कागदपत्रांमध्ये केवायसी संबंधित कागदपत्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि घराशी संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत.
उत्पन्नाची कागदपत्रेउत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये तुम्ही पगारदार वर्गातून असल्यास तुम्हाला गेल्या दोन ते तीन वर्षांचा फॉर्म-१६, दोन ते सहा महिन्याच्या पगाराची पावती, गुंतवणुकीसंबंधी पुरावा (उदा. मुदत ठेव, शेअर इ.), वेतनवाढ किंवा पदोन्नती पत्र, गेल्या तीन वर्षांपासून आयकर विवरणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून देऊ शकता.जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, तर तुम्ही व्यवसाय परवाना तपशील, ताळेबंद, तीन वर्षांचा आयकर परतावा आणि कंपनीचे नफा आणि तोटा खात्याचे निवेदन (सीएद्वारे प्रमाणित), जर तुम्ही डॉक्टर किंवा सल्लागार असाल, व्यावसायिक प्रॅक्टिसचा परवाना, आस्थापनांचे नोंदणी प्रमाणपत्र (दुकान, कारखाना आणि इतर आस्थापना), दस्तऐवज म्हणून व्यवसाय पत्त्याचे प्रमाणपत्र देऊ शकता.
केवायसी संबंधीत कागदपत्रेतुम्ही ओळखपत्रासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स कागदपत्रांपैकी एक वापरू शकता. तसेच, तुम्ही वयाच्या प्रमाणपत्रासाठी १० वीची मार्कशीट, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड यापैकी एक अर्ज करू शकता. निवासी प्रमाणपत्रांसाठी तुम्ही बँक पासबुक, युटिलिटी बिल (टेलिफोन बिल, वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल), रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र आणि एलआयसी पॉलिसीची पावती यासारख्या कागदपत्रांपैकी एक वापरू शकता.