Join us

टॅलेंटेड कनिष्ठांना मिळते सीईओंपेक्षा अधिक वेतन!

By admin | Published: February 05, 2016 3:19 AM

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अथवा चेअरपर्सन अशा बड्या पदांवरील व्यक्तीपेक्षाही प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कनिष्ठ

नवी दिल्ली : मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अथवा चेअरपर्सन अशा बड्या पदांवरील व्यक्तीपेक्षाही प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना जास्त वेतन मिळत असल्याचा कल औद्योगिक जगतातून समोर आला आहे. मुंबई शेअर बाजारातील टॉप-२00 कंपन्यांपैकी २२ बड्या कंपन्यांत सीईओ अथवा त्या दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा कामगिरी दर्शविणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना जास्त वेतन मिळाल्याचे २0१४-१५ या आर्थिक वर्षातील अभ्यासात आढळून आले आहे. इतरही अनेक कंपन्यांत ही स्थिती आढळून आली आहे. भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही हा कल दिसून येत आहे. कॉर्पोरेट जगतातील बदलाची ही नांदी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. अमेरिकेतील २२ अधिकारी सीईओंपेक्षा जास्त वेतन घेत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. जगातील आघाडीची कंपनी अ‍ॅपलमध्येही हीच स्थिती आहे. कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्यापेक्षा अन्य कंपन्यांमधून खेचून आणलेल्या काही वरिष्ठ गुणवंतांना जास्त वेतन देण्यात आले आहे. सिटीग्रुप कॅपिटल मार्केटसचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक परमिट जव्हेरी यांच्यापेक्षा त्यांचे कनिष्ठ अधिकारी इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे हेड रवी कपूर यांना अधिक वेतन असल्याचे समोर आले आहे.