लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण्ड जगन्नाथ हे भारत दौऱ्यावर असून, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची दिल्लीत भेट घेट घेतली.
मॉरिशस व भारत यांची हायड्रोकार्बन क्षेत्रात भागीदारी असून, भारतातील मंगलोर रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल्सतर्फे मॉरिशसला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा केला जातो. तेल आणि वायू क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करीत आहे. त्याविषयी, तसेच मॉरिशसमधील नैसर्गिक वायू क्षेत्राविषयी त्या दोघांत चर्चा झाली. भारताचे शिष्टमंडळाने मॉरिशसमध्ये जाऊ न तेथील अधिकारी व संबंधितांशी चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले. मॉरिशसचे व्हिजन २0१३ अंतर्गत क्षेत्रीय हायड्रोकार्बन व्यापारविषय हब बनण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भारतातर्फे साह्य करण्याचे आश्वासन प्रधान या वेळी मॉरिशसच्या पंतप्रधानांना दिले.
प्रविण्ड जगन्नाथ यांच्याशी धर्मेंद्र प्रधान यांची चर्चा
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण्ड जगन्नाथ हे भारत दौऱ्यावर असून, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची दिल्लीत
By admin | Published: May 29, 2017 12:52 AM2017-05-29T00:52:02+5:302017-05-29T00:52:02+5:30