Join us  

आर्थिक वृद्धीचे ‘लक्ष्य’ चीन घटविण्याची शक्यता

By admin | Published: October 14, 2015 12:32 AM

सध्याची आर्थिक मंदी पाहता चीन २०१६-२० या १३ व्या पंचवार्षिक योजनेतील आर्थिक वृद्धीचे लक्ष्य सात टक्क्यांवरून घटवून ६.५ टक्के करण्याची शक्यता आहे.

बीजिंग : सध्याची आर्थिक मंदी पाहता चीन २०१६-२० या १३ व्या पंचवार्षिक योजनेतील आर्थिक वृद्धीचे लक्ष्य सात टक्क्यांवरून घटवून ६.५ टक्के करण्याची शक्यता आहे.‘इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन’ या वृत्तपत्राने तज्ज्ञांचा हवाला देऊन म्हटले आहे की, यंदा आर्थिक वृद्धीचे लक्ष्य सात टक्के असे निश्चित करण्यात आले असले तरीही पुढील पंचवार्षिक योजनेत हे लक्ष्य घटवून ६.५ टक्के एवढे ठेवले जाण्याची शक्यता आहे.चीनची आर्थिक वृद्धी घटून ६.८ आणि २०१६ मध्ये ६.३ टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला होता. २०१४ मध्ये चीनचा वृद्धीदर ७.४ टक्के होता.अध्यक्ष शी चिनफिग यांच्या नेतृत्वाखालील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महापरिषदेची बैठक झाल्यानंतर वृद्धीदराचे ‘लक्ष्य’ घटविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या महापरिषदेची २६ ते २९ आॅक्टोबर दरम्यान बैठक होणार आहे.