Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य

कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य

Airtel May Hike Tarrif : कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक असल्याची मित्तल यांची माहिती. टॅरिफ वाढवण्यासाठी संकोच करणार नसल्याचं मित्तल यांचं वक्तव्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:34 PM2021-08-31T19:34:15+5:302021-08-31T19:38:20+5:30

Airtel May Hike Tarrif : कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक असल्याची मित्तल यांची माहिती. टॅरिफ वाढवण्यासाठी संकोच करणार नसल्याचं मित्तल यांचं वक्तव्य.

Tariff hike only way we wont shy away Bharti Airtels Sunil Mittal said | कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य

कंपनीवर कर्जाचा बोजा अधिक, टॅरिफ वाढवू शकतो; Airtel च्या सुनील मित्तल यांचं मोठं वक्तव्य

Highlightsकंपनीवर कर्जाचा बोजा अधिक असल्याची मित्तल यांची माहिती.टॅरिफ वाढवण्यासाठी संकोच करणार नसल्याचं मित्तल यांचं वक्तव्य.

रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) बाजारातील एन्ट्रीनंतर अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅन्सही स्वस्त केले होते. परंतु आता टॅरिफ प्लॅनसंबंधी भारतीएअरटेलचे (Bharti Airtel) संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "कंपनी टॅरिफ प्लॅन वाढवण्यासाठी कोणताही संकोच करणार नाही," असं मित्तल म्हणाले. 

एअरटेलनं आपल्या शेअरहोल्डर्सना राईट्स इश्यू जारी करून २१ हजार कोटी रूपये जमवण्याचं आवाहन केलं. कंपनीनं सध्या देशात 5G सेवा लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी कंपनी आपली बॅलन्सशीट मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीवर जून महिन्याच्या अखेरपर्यंत १.६ लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे. तर कंपनीकडे सध्या ४३.१२ कोटी ग्राहक आहेत. 

पुढील वर्षी 5G 
"कंपनी पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 5G लाँच करण्याची योजना आखत आहे. आम्हाला आशा आहे की स्पेक्ट्रम लिलावाची किंमत कमी ठेवली जाईल," असं मित्तल म्हणाले. "सध्या कंपनीवर कर्ज अधिक आहे. कर्जामुळे गुंतवणूकदार आणि कंपनी दोघंही चिंताग्रस्त आहेत. दूरसंचार क्षेत्रावरील टॅक्स आणि अन्य चार्जेस कमी केले पाहिजेत," असंही ते म्हणाले. भारती एअरटेलनं ३१ मार्च २०२१ पर्यंत AGR च्या रकमेपैकी १८,००४ कोटी रूपये फेडले आहेत. कंपनीवर एकूण ४३ हजार कोटी रूपयांचे देणे आहे.

एअरटेल राईट्स इश्यूद्वारे २१ हजार कोटी रूपये जमवणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याद्वारे कंपनी आपलं कॅश रिझर्व्ह अधिक मजबूत करणार आहे. तसंच काही रक्कमदेखील फेडेल. याशिवाय काही रकमेचा वापर नेटवर्क वाढवण्यासाठी, 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी आणि त्याच्या रोलआऊटवरही खर्च करण्यात येईल.

Web Title: Tariff hike only way we wont shy away Bharti Airtels Sunil Mittal said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.