Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सहकारा’साठी टास्क फोर्स

‘सहकारा’साठी टास्क फोर्स

राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान दिलेल्या सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करतानाच सहकार टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी लवकरच एका टास्क फोर्सची निर्मिती करण्याची घोषणा

By admin | Published: April 22, 2016 02:50 AM2016-04-22T02:50:31+5:302016-04-22T02:50:31+5:30

राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान दिलेल्या सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करतानाच सहकार टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी लवकरच एका टास्क फोर्सची निर्मिती करण्याची घोषणा

Task Force for 'Co-operatives' | ‘सहकारा’साठी टास्क फोर्स

‘सहकारा’साठी टास्क फोर्स

मुंबई : राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान दिलेल्या सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करतानाच सहकार टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी लवकरच एका टास्क फोर्सची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येथे एकदिवसीय सहकार संस्कार परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
आमचे सरकार सहकार संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही लोक करत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांनी सहकार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार सहकाराचे मारक नसून त्याला नवसंजीवनी देणारे असेल. सहकार क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या व आव्हाने यांचा वेध घेत भविष्यात सहकाराच्या मजबुतीसाठी काय करणे आवश्यक आहे, याचा वेध घेण्यासाठी हा टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे राहिले आहे; परंतु संस्थेपेक्षा व्यक्तिगत स्वार्थ आणि अपप्रवृत्ती फोफावतात, त्यावेळी त्या संस्थांना घरघर लागते असे ते म्हणाले. राज्यात सहकाराच्या मारेकऱ्यांनी असे अनेक साखर कारखाने बुडविले असून, हे कारखाने बुडाल्यानंतर त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या जिल्हा बँका अडचणीत आल्या. या बँका अडचणीत आल्यानंतर जसा सभासदांना फटका बसला तसाच फटका शेतकऱ्यांना बसला. जिल्हा बँका बुडाल्यामुळे मग शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढावे लागते. सावकार व्याजावर व्याज लावत जातो. कर्ज थकते. गहाण टाकलेली जमीन जाते व नंतर मग शेतकरी आत्महत्या करतो, असे हे दुष्टचक्र असून ते तोडून सहकारी चळवळीला पुन्हा ताकद देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या परिषदेचे आयोजक आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष आ.प्रवीण दरेकर यांनी सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांची माहिती देतानाच काही प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. तसेच, राज्यातील सहकाराची विशाल परंपरा जपण्यासाठी ‘सहकार भवन’ उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत एका भूखंडाची मागणीही दरेकर यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Task Force for 'Co-operatives'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.