मुंबई - स्वदेशी प्रवासी विमान निर्मितीसाठी लवकरच ‘टास्क फोर्स’ स्थापन केला जाईल. वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालय त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी भारत-अमेरिका हवाई सहकार्य परिषदेत दिली.परिषदेच्या उद्घाटनात प्रभू म्हणाले, भारतीय कंपन्यांनी ड्रोन निर्मितीसाठी समोर यावे यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही मंत्रालये प्रवासी विमान निर्मितीसाठी आराखडा आखतील.संवाद प्रणालीला ९४४ कोटींचे कवचकोलकाता विमानतळाजवळ बीएसएनएलची केबल मागील वर्षी कापली गेल्याने डेटा करप्ट झाला होता. आता अमेरिकन हारिस टेक्नॉलॉजी कंपनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ९१ विमानतळांवरील संवाद प्रणालीला सुरक्षा कवच देईल. याचा ९४४ कोटींचा करार या वेळी करण्यात आला.
स्वदेशी विमानांसाठी ‘टास्क फोर्स’, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:15 AM