Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

डिजिटल क्षेत्रात टाटा विस्तार करणार; रिटेल क्षेत्रात दिग्गजांना नामोहरम करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:13 PM2021-05-28T15:13:14+5:302021-05-28T15:16:17+5:30

डिजिटल क्षेत्रात टाटा विस्तार करणार; रिटेल क्षेत्रात दिग्गजांना नामोहरम करण्याची तयारी

Tata Acquires Majority Stake In Bigbasket Set Up Retail Clash With Mukesh Ambani | टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

टाटा समूहानं आता डिजिटल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं आहे. कोरोना संकट येण्याआधी ऑनलाईन ग्रॉसरी शॉपिंगचं प्रमाण वाढलं होतं. कोरोना काळात तर ग्रॉसरी शॉपिंगला आणखी अच्छे दिन आले. त्यामुळेच या क्षेत्रात वेगानं विस्तार करण्यासाठी टाटा डिजिटलनं बिग बास्केट कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे आता टाटा बिग बास्केटच्या माध्यमातून रिलायन्स रिटेल, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासारख्या बड्या कंपन्यांना थेट टक्कर देईल.

अबब! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी एका मिनिटाला किती कमवतात माहित्येय? PM चा पगारही कमी

टाटा डिजिटलनं बिग बास्केट कंपनी ताब्यात घेतली आहे. मात्र यासाठी कंपनीनं किती पैसे मोजले याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. टाटा समूहानं बिग बास्केटमध्ये ६४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. बिग बास्केटच्या संचालकीय बोर्डानं याच आठवड्यात याबद्दलच्या कराराला मंजुरी दिल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. टाटा डिजिटलनं बिग बास्केट या बंगळुरूस्थित स्टार्ट अपमध्ये २० कोटींची प्राथमिक गुंतवणूक केली आहे.

भारतातील ११ सर्वात महागडी घरं; किंमत एवढी की काही देशांचा GDP ही नसेल इतका!
 
बिग बास्केटमध्ये याआधी चीनच्या अलिबाबा समूह आणि एक्टिस एलएलपीचा मोठा हिस्सा होता. मात्र आता ते यातून बाहेर पडले आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगानं (सीसीआय) गेल्याच महिन्यात या कराराला मंजुरी दिली. बिगबास्केट आणि ऑनलाईन फार्मसी 1mg नंतर आता टाटा समूहाची नजर फिटनेस स्टार्टअप क्युरफिटवर आहे. रिटेल क्षेत्रात रिलायन्स उद्योग आणि ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी याला महत्त्व आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहाची क्युरफिटचे संस्थापक मुकेश यांच्याशी बातचीत सुरू आहे.  त्यांना टाटा डिजिटलच्या व्यवसायात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. बन्सल ऑनलाईन फॅशन रिटेलर मिंत्राचे सहसंस्थापकदेखील आहेत. ते गेल्या ५ वर्षांपासून क्युरफिटची धुरा सांभाळत आहेत.

Web Title: Tata Acquires Majority Stake In Bigbasket Set Up Retail Clash With Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.