Tata In Banking: भारतीय रिझर्व्ह बँक देशातील उद्योग घराण्यांच्या कमर्शिअल बँकिंग व्यवसायात एन्ट्रीवर गप्प बसली आहे. आरबीआयने एका इंटरनल वर्किंग ग्रुपच्या 33 सल्ल्यांपैकी 21 सल्ले स्वीकारले आहेत. यामुळे टाटा, बिर्लासारख्या बड्या उद्योगांना बँकिंग व्यवसाय सुर करण्याच्या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
भारतात उद्योग घराण्यांनी गेल्या काही काळापासून कमर्शिअल बँकिंग व्यवसायात एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे अनेक माजी बँकर आणि राजकीय नेत्यांनी यावर टीका केली आहे. या आधीही औद्योगिक घराण्यांना कमर्शिअल बँका चालविण्याचा प्रस्ताव आरबीआयने फेटाळून लावला होता. रिझर्व्ह बँकेने सांगितलेले की या प्रकारचे 12 प्रस्ताव विचाराधिन आहेत. सोबतच रिझर्व्ह बँकेने मिनिमम कॅपिटलची अट दुप्पट म्हणजेच हजार कोटी रुपये केली आहे. तसेच बँकेत प्रमोटरांची भागीदारी 26 टक्क्यांवर ठेवण्यास देखील मंजुरी दिली आहे.
टाटा आणि बिर्ला या कंपन्या सध्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या चालवत आहेत. यामुळे टाटा आणि बिर्लासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, एनबीएफसीसाठी देखील कठोर नियम केले जाणार आहेत. एनबीएफसींनाही सामान्य बँकांसारख्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
यासोबतच रिझर्व्ह बँकेने पेमेंट्स बँकेला तीन वर्षांत स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित करण्याचा प्रस्तावही स्थगित ठेवला आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेसारख्या कंपन्यांचे व्यावसायिक बँकिंग व्यवसायाचे स्वप्न भंगले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, "लोकांच्या सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन 21 सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर सर्व सूचनांवर सध्या विचार सुरू आहे."