Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार

जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार

TATA ग्रुप देशातला सर्वात मोठा ग्रुप. टाटा समुहाचा भारतातच नाहीतर जगातील अनेक देशात मोठा व्यवसाय आहे. भारतात सुरू झालेला समुह आज जगभरात पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:41 PM2023-02-25T17:41:38+5:302023-02-25T17:47:30+5:30

TATA ग्रुप देशातला सर्वात मोठा ग्रुप. टाटा समुहाचा भारतातच नाहीतर जगातील अनेक देशात मोठा व्यवसाय आहे. भारतात सुरू झालेला समुह आज जगभरात पोहोचला आहे.

tata consultancy services limited presence in 5 continents and 55 countries indian company | जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार

जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार

TATA ग्रुप देशातला सर्वात मोठा ग्रुप. टाटा समुहाचा भारतातच नाहीतर जगातील अनेक देशात मोठा व्यवसाय आहे. भारतात सुरू झालेला समुह आज जगभरात पोहोचला आहे, TATA समुहाचा विस्तार रतन टाटा यांच्या नेतृत्वात जोरदार झाला. टाटा समुहाच्या अनेक वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. यात एक कंपनी अशी आहे, जी सर्व कंपन्यांमध्ये जोरदार आहे. ही कंपनी जगभरात पोहोचली आहे. ही कंपनी ५५ देशात काम करते, या देशांत टाटाचे आलिशान ऑफिस आहेत. भारत, अमेरिकेसह ऑस्ट्रेलियापर्यंत जगभरात या कंपनीचे ६,००,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

संपूर्ण जगात ठसा उमटवणारी ही कंपनी दुसरी कोणी नसून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) आहे. TCS ही भारतातील बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी आहे. ही टेक कंपनी देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. जगातील नामांकित आयटी कंपन्यांमध्येही त्याचे नाव समाविष्ट आहे. या संदर्भात टाटा समुहाच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे.

अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

TATA समूहाच्या अंतर्गत कार्यरत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) चे मुख्यालय मुंबई येथे आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत TCS ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. टीसीएस हा जगातील सर्वात मोठा आयटी ब्रँडपैकी एक आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये, टीसीएसचे बाजार भांडवल २०० अरब डॉलर नोंदवले होते. एवढं मोठ भंडवल असणारी भारतातील ही एकमेव कंपनी आहे. 

२५ ऑगस्ट २०२४ रोजी TCS ही पब्लिक लिस्टेड कंपनी बनली. २००५ मध्ये, TCS ही बायोइन्फर्मेटिक्स मार्केटमध्ये प्रवेश करणारी भारतातील पहिली कंपनी बनली. TCS ने भारतात पासपोर्ट सेवा केंद्र देखील चालवते. '१९७९ मध्ये टीसीएसचे पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय न्यूयॉर्क, यूएसए येथे सुरू झाले. आता ही कंपनी ५ खंड आणि ५५ देशांमध्ये अस्तित्वात आहे, असं टाटा समुहाने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Web Title: tata consultancy services limited presence in 5 continents and 55 countries indian company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.