Join us

टाटा सन्स TCS चे शेअर्स विकणार; 9300 कोटी रुपयांमध्ये मोठी डिल होणार, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 9:02 PM

Tata Sons: या डील अंतर्गत टाटा सन्स TCS चे 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे.

Tata Consultancy Services : देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या Tata Sons ने TCS मधील आपला हिस्सा विकण्याचा निर्मय घेतला आहे. टाटा सन्स ब्लॉक डीलद्वारे 4001 रुपये प्रति शेअर किमतीने TCS चे सुमारे 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टाटा सन्सला या डीलद्वारे 9300 कोटी रुपये मिळतील. दरम्यान, TCS मध्ये टाटा सन्सचा 72.38 टक्के हिस्सा आहे.

TCS ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटी रुपये आहे. याच्या वर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप 19.47 लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत TCS ही देशातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. सोमवारी बाजार बंद होताना TCS च्या एका शेअरची किंमत 4,144 रुपये होती.

टाटा सन्सने का घेतला हिस्सा विकण्याचा निर्णय?ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टाटा सन्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन नियमांनुसार स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट व्हावे लागणार आहे. TCS च्या या ब्लॉक डीलमुळे टाटा समुहाला टाटा सन्सचे सार्वजनिक मार्केट लिस्ट टाळायचे आहे. RBI च्या नियमांनुसार सर्व मोठ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना (NBFCs) स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट व्हावे लागणार आहे. टाटा सन्स देखील याच प्रकारात मोडते. या डिलमुळे कंपनीला लिस्टिंगपासून वाचता येईल.

टीसीएसच्या शेअरने सर्वकालीन उच्चांक गाठलासोमवारी TCS च्या शेअर्सनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4254.45 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. मात्र, दिवसअखेर तो 1.7 टक्क्यांनी घसरुन 4144.75 रुपयांवर बंद झाला. TCS चे बाजार मूल्य 15 ट्रिलियन रुपये आहे. बाजार मूल्याच्या बाबतीत ही कंपनी दोन नंबरवर आहे. एक नंबरवर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना 30% परतावा दिला आहे.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक