Join us

TATA च्या ‘या’ कंपनीचा जगात डंका; IT क्षेत्रात नंबर वन होण्यासाठी एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 8:00 PM

टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस टाटा ग्रुपच्या सर्वात महत्त्वांच्या कंपनींपैकी एक आहे. जी आयटी सेवेत काम करते

मुंबई – टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेसनं(TCS) नवा रेकॉर्ड रचला आहे. संपूर्ण जगात आयटी सर्व्हिस सेक्टरमध्ये टाटा कंसल्टेंसी दुसऱ्या नंबरची मूल्यवान कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. ब्रांड फायनान्सच्या एका रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली, जी पीटीआयनं जारी केली आहे. टाटा कंसल्टेंसीशिवाय भारतातील अन्य दिग्गज कंपन्या Infosys आणि चार टेक कंपन्यांनी टॉप २५ मध्ये जागा बनवली आहे.

टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस टाटा ग्रुपच्या सर्वात महत्त्वांच्या कंपनींपैकी एक आहे. जी आयटी सेवेत काम करते. इंफोसिस आयटीतील सर्वात मोठी कंपनी आहे. परंतु टीसीएसच्या तुलनेत जगात इतकं मोठं नाव नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या १० मोठ्या आयटी सर्व्हिसेसमध्ये ६ भारतीय ब्रॅन्ड आहेत. पूर्ण जगात Accenture नाव पहिल्या स्थानावर आहे जी किंमतीत सर्वात मजबूत आयटी ब्रॅन्ड आहे. रिपोर्टनुसार, एसेंजरचं मार्केट व्हॅल्यू ३६.२ बिलियन डॉलर आहे. भारतात आयटी कंपन्यांमध्ये २०२० ते २०२२ या काळात उच्चांक पाहायला मिळाला.

रिपोर्टमध्ये काय आहे?

ब्रॅन्ड फायनान्सच्या रिपोर्टमध्ये आता काम धंद्यात रिमोट वर्किंग अथवा वर्क फ्रॉम होम सामान्य झालं आहे. हा नवा ट्रेंड जगात पाहायला मिळाला. जागतिक अर्थव्यवस्थेत डिजिटलकरणचा महत्त्वाचा भाग राहिला. याचमुळे मागील २ वर्षात आयटी सेवेत सर्वात झपाट्याने वाढ झाली. भारत यात नशीबवान आहे. कारण जगातील मोठे ब्रॅन्ड भारतात आहेत. येणाऱ्या काळात भारत आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा एनालिटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्सची मोठी भूमिका असेल. आयईबीएम रॅकिंगमध्ये चौथ्या स्थानावर गेली तर टीसीएसनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

TCS ला किती झाला नफा?

टीसीएसनं वर्षभरात १२ टक्के आणि २०२० नंतर २४ टक्के प्रगती केली आहे. टीसीएसची ब्रॅन्ड व्हॅल्यू १६.८ बिलियनपर्यंत पोहचली आहे. २०२१ मध्ये टीसीएसच्या कमाईत वाढ झाली. त्यात २५ अरब डॉलरची रेकॉर्ड कमाई झाली. टीसीएसची ही मोठी कमाई आहे. २५ परसेंटच्या तुलनेत आयटी इंडस्ट्री प्रॉफिट मार्जिन बघितलं जातं. पहिल्यांदाच टीसीएस ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या तुलनेत जगातील आयटी कंपन्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.  

टॅग्स :टाटा