टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्सनी लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या स्टॉकमध्ये ४ हजार १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२३ मध्ये समाप्त झालेल्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीची कमाई समोर आल्यानंतर हा स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचं निव्वळ नफा दर वर्षाच्या आधारावर २२ टक्क्यांनी वाढून ३३८ कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीसाठी ऑपरेशनमधून उत्पन्न १२ टक्के वाढून ३४७१ कोटी रुपये एवढं झालं आहे. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या फूड आणि बेवरेज कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये चहा, कॉफी, पाणी आरटीडी, मीठ डाळी, मसाले, रेडी टू कूक आणि रेडी टू ईट, स्नॅक्स आणि मिनी फूड्सचा समावेश आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड चहा कंपनी आहे. त्याच्या फूड पोर्टफोलिओमध्ये टाटा सॉल्ट, टाका संपन्न आणि टाटा सोलफुल सारखे ब्रँड्स आहेत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्सवर १०१० रुपयांचे टार्गेट प्राइससोबत बाय रेटिंग दिले आहे. शुक्रवारी कंझ्युमर प्रॉडक्टचे शेअर १.१० टक्क्यांच्या तेजीसह ८५९.४० रुपयांवर क्लोज झाले. नुवामा इन्स्टिट्युशनल इक्विटिजनेसुद्धा ९२५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे.
सन २००३ मध्ये १८ जुलै रोजी टाटा कन्झ्युमरचे शेअर २१.३१ रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक ८५० रुपयांच्या पार गेला आहे. या स्टॉकचा ५२ व्या आठवड्यातील उच्चांक हा ८८३.९३ रुपये एवढा आहे. तर त्याचा निचांक हा ६८६.६० रुपये आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये टाटा कन्झ्युमरचे शेअर ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)