Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA नं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली 'बंपर' भेट; ६२ टक्क्यांपर्यंत वाढवला पगार

TATA नं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली 'बंपर' भेट; ६२ टक्क्यांपर्यंत वाढवला पगार

या काळात ग्रुपच्या अधिकाऱ्यांची ग्रोथ २० टक्के झाली आहे. टाटा सन्स बोर्डाच्या संचालकांनी या कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ही बंपर भेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 06:27 PM2023-06-13T18:27:53+5:302023-06-13T18:28:52+5:30

या काळात ग्रुपच्या अधिकाऱ्यांची ग्रोथ २० टक्के झाली आहे. टाटा सन्स बोर्डाच्या संचालकांनी या कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ही बंपर भेट दिली आहे.

TATA gave a 'bumper' gift to the company's employees; Salary hiked up to 62 percent | TATA नं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली 'बंपर' भेट; ६२ टक्क्यांपर्यंत वाढवला पगार

TATA नं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली 'बंपर' भेट; ६२ टक्क्यांपर्यंत वाढवला पगार

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह टाटा ग्रुपनं त्यांच्या टॉप अधिकाऱ्यांच्या पगारावर बंपर वाढ केली आहे. यावर्षी टाटा ग्रुपने अधिकाऱ्यांच्या पगारात ६२ टक्क्यांपर्यंत वाढ करत त्यांना मोठे गिफ्ट दिले. समुहाच्या ट्रेंट, इंडियन हॉटेल्स आणि टाटा कंझ्युमरसारख्या नफा मिळवणाऱ्या कंपन्यातील अधिकाऱ्यांचा पगारात सर्वाधिक वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये टाटा ग्रुप सेल्समध्ये महसूल ९७ अब्ज डॉलर इतका झालाय जो आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. 

या काळात ग्रुपच्या अधिकाऱ्यांची ग्रोथ २० टक्के झाली आहे. टाटा सन्स बोर्डाच्या संचालकांनी या कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ही बंपर भेट दिली आहे. या पगारवाढीत सॅलरी, कमिशन आणि दुसऱ्या सुविधांचा समावेश आहे. सर्वात जास्त वाढ ही रिटेल साखळीतील ट्रेंटचे सीईओ पी. वैंकटसैलू यांना दिली आहे. त्यांना ५.१२ कोटी सॅलरीसह एकूण ६२ टक्के पगारवाढ कंपनीने दिली आहे. 

ट्रेंटचे नेट प्रॉफिट मागील वर्षी १० पटीने वाढून ३९४ कोटी इतके झाले. तर रेवेन्यू ८० टक्के वाढून ८२४२ कोटींवर पोहचले आहे. इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांना १८.२३ कोटी पगारासह ३७ टक्के वाढ दिली आहे. टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसुझा यांना २४ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. त्यांचा पगार आता ९.४ कोटींपर्यंत पोहचला आहे. वोल्टासचे प्रदीप बख्शी यांना २२ टक्के आणि टाटा केमिकल्सचे मुकुंदन आणि टाटा पॉवरचे प्रविर सिन्हा यांना प्रत्येकी १६ टक्के वाढ दिली आहे. सर्वात कमी पगारवाढ टीसीएसचे राजेश गोपीनाथन यांना मिळाली आहे. त्यांच्या पगारात १३ टक्क्यांनी वाढ झाली असून पगार २९.१ कोटींवर पोहचला आहे. गोपीनाथन आता टीसीएस सोडून गेले आहेत. 

टाटा समुहाचा व्यवसाय
टाटा समुहाचा व्यवसाय हा विविध क्षेत्रात पसरला आहे. त्यात टेक्नोलॉजी, स्टील, ऑटो, कंझ्युमर आणि रिटेल, इन्फास्ट्रक्चर, फायनॅन्सियल सर्व्हिस, एयरोस्पेस अँड डिफेंस, टूरिझ्म अँड ट्रॅव्हल, टेलिकॉम अँड मीडिया, ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंटचा सहभाग आहे. टाटा ग्रुपच्या कंपन्यांची संख्या ३० पर्यंत पोहचली आहे. टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२३ हे वर्ष टाटा समुहासाठी भाग्यशाली ठरले. मागील २ वर्षात टाटाच्या २८ लिस्टेड कंपन्यांपैकी २६ कंपन्यांनी मार्केटमध्ये चांगले प्रदर्शन केले. या काळात मार्केट कॅप ३ लाख कोटींपर्यंत पोहचला. त्यासोबत १७ कंपन्यांनी मागील वर्षात ११ ते ९० टक्के ग्रोथ मिळवली आहे. 

Web Title: TATA gave a 'bumper' gift to the company's employees; Salary hiked up to 62 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा