टाटा समूहाने मार्च 2024 पर्यंत एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा एअरलाइन्स (Vistara Airlines) च्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे. समूहाने याच वर्षात एअर इंडियाचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. विस्तारा एअरलाइन्स ही टाटा समूहाच्या सह-मालकीची कंपनी आहे.
सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी आणि टाटा सन्सने आता विस्ताराला एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. विस्ताराच्या विलिनीकरणानंतर, एअर इंडिया (Air India and Vistara Merger) देशातील सर्वात मोठी फुल कॅरिअर एअरलाइंस असेल. जी देशासह जगभरात आपली सेवा देईल.
18,000 कोटींमध्ये खरेदी केलीय Air India -एअर इंडियाच्या अधिग्रहणाचा व्यवहार 18,000 कोटी रुपयांत झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये हा सौदा पूर्ण झाला. टाटाने एअर इंडियासाठी जेवढा पैसा मोजला आहे, यांत एअर इंडियावरील एकूण थकीत कर्जापैकी 15,300 कोटींचाही समावेश होता.
टाटा समूहाने एअर इंडियाचे जे अधिग्रहण केले, त्याकडे ‘होम कमिंग’ प्रमाणे बघितले जात होते. कारण वर्ष 1932 मध्ये Air India ची सुरुवात टाटा ग्रुपनेच केली होती. जे. आर. डी. टाटा (JRD Tata) यांनी सर्वप्रथम Tata Airlines च्या रुपाने याची सुरुवात केली होती. यानंतर हिचे नाव एअर इंडिया करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर, जेव्हा भारतातून सर्वसामान्य हवाई सेवांची सुरुवात झाली, तेव्हा एअर इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनवण्यात आली होती.