Ratan Tata Instagram: आताच्या घडीला केवळ भारतात नाही, तर जगभरात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांचा टाटा समूह जगभरात पसरलेला आहे. अगदी मीठापासून ते विमानांपर्यंत अनेकविध क्षेत्रात टाटा काम करत असून, शेकडो कंपन्यांचे संचालन टाटांमार्फत केले जाते. रतन टाटा हे सोशल मीडियावर फारसे सक्रीय नसले, तरी जगभरातील लाखो लोक त्यांना फॉलो करतात. इन्स्टाग्रामवरहीरतन टाटांची जादू कायम आहे. इन्स्टाग्रामवर रतन टाटा यांचे ८.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र, केवळ एका अकाऊंटला रतन टाटा फॉलो करतात.
रतन टाटा हे भारतातील सर्वांत दिग्गज उद्योगपती म्हणून ओळखले जातात. टाटा ट्रस्टची गोष्ट सर्वश्रुत आहे. जमशेदजी टाटा यांनी उभा केलेला टाटा उद्योग समूह रतन टाटा यांनी भारतासह जगभरात पोहोचवला. रतन टाटा यांचे विचार, कर्तृत्व अनेकांना प्रेरणादायी आहे. रतन टाटा त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स येतात. परंतु, रतन टाटा फॉलो करत असलेला अकाऊंट कोणता, याची उत्सुकता अनेकांना आहे.
रतन टाटा एकाच अकाउंटला करतात इन्स्टाग्रामवर फॉलो!
इन्स्टाग्रामवर ८.५ मिलियन फॉलोवर्स असलेले रतन टाटा हे टाटा ट्रस्ट या धर्मादाय संस्थेलाच फॉलो करतात. रतन टाटांनी तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंट ओपन केले. तेव्हापासून त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. इन्स्टावरील त्यांचे फोटो, व्हिडिओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. रतन टाटा कधी बालपणाचे, कधी तरुण वयातील तर कधी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कधी चाहत्यांसोबतच्या आठवणी, गोष्टी शेअर करतात. अलीकडे त्याच्या तरुण वयातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता, ज्याला १० लाखांच्यावर लाईक्स आणि शेअर्स होते.
दरम्यान, टाटा ट्रस्ट ही रतन टाटा यांच्या मालकीची आहे. या संस्थेची स्थापना १९१९ मध्ये झाली. टाटा ट्रस्ट हे भारतातील सर्वात जुने एंडॉवमेंट फाउंडेशन आहे. कल्याणकारी कामांसाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. टाटा समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स ही प्रमुख गुंतवणूकदार आहे. तिचा ६६ टक्के हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या शेअरचा लाभांश टाटा ट्रस्टला येतो जेणेकरून धर्मादाय निधीची कमतरता भासू नये.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रात काम केले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"