Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

Tata Group will takeover BigBasket: टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 01:19 PM2020-12-02T13:19:03+5:302020-12-02T13:24:24+5:30

Tata Group will takeover BigBasket: टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे.

tata Group close to acquire BigBasket for $1.6 billion; negotiation going on | टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटानेचीनच्या अलिबाबाची कंपनी बिग बास्केट विकत घेणार आहे. जवळपास १.६ अब्ज डॉलर मोजून टाटा या कंपनीत ८० टक्के समभाग विकत घेणार आहे. या बाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. 


टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे. चीनची मोठी कंपनी अलीबाबाचे पाठबळ असलेली बिग बास्केट कोरोना काळात फुल फॉर्ममध्ये आली आहे. कोरोना काळात लोक घरातून बाहेर पडत नाहीत. यामुळे दैनंदिन भाजीपाला, वस्तू या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बिग बास्केट करत आहे. तसेच लोकही या वस्तू ऑनलाईन खरेदी करत आहेत. मिंटने या व्यवहाराची माहिती दिली आहे. टाटाच्या प्रवक्त्याने यावर बोलण्यास नकार दिला असून बिग बास्केटकडूनही यावर काही उत्तर आलेले नाही. 


बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत होती. यामध्ये सिंगापूर सरकारची टेमासेक, अमेरिकेची जनरेशन पार्टनर्स, फिडेलिटी आणि टायबर्न कॅपिटल सारख्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. कंपनी या व्यवहारातून 35 ते 40 कोटी डॉलर गोळा करण्याच्या विचारात होती. यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 33 टक्के वाढून 2 अब्ज डॉलरवर जाऊ शकते. 


टाटामध्येही होणार गुंतवणूक 
 टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट आणि टाटा समूहामध्ये या संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत ६६ टक्के भागीदारीची खरेदी केली होती. आता टाटा समूहासोबतचा वॉलमार्टचा करार हा फ्लिपकार्टपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. या करारासाठी वॉलमार्टकडून २० ते २५ हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला तर सुपरअ‍ॅप टाटा समूह आणि वॉलमार्टचा संयुक्त प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: tata Group close to acquire BigBasket for $1.6 billion; negotiation going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.