Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA Group Company : टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपणार! महत्त्वाच्या प्लानला मिळाली मंजुरी

TATA Group Company : टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपणार! महत्त्वाच्या प्लानला मिळाली मंजुरी

Tata Motors news: पाहा कोणत्या कंपनीचं अस्तित्व आता संपणार आहे आणि काय म्हटलंय कंपनीनं, काय आहे कंपनीचा प्लान.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:50 PM2024-06-05T12:50:06+5:302024-06-05T12:50:40+5:30

Tata Motors news: पाहा कोणत्या कंपनीचं अस्तित्व आता संपणार आहे आणि काय म्हटलंय कंपनीनं, काय आहे कंपनीचा प्लान.

TATA Group Company tata motors finance company will end its existence tata motors share price up An important plan has been approved | TATA Group Company : टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपणार! महत्त्वाच्या प्लानला मिळाली मंजुरी

TATA Group Company : टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपणार! महत्त्वाच्या प्लानला मिळाली मंजुरी

Tata Motors news: टाटा मोटर्स फायनान्सचं टाटा कॅपिटलमध्ये विलीनीकरण करण्यास संबंधित संचालक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड ही टाटा मोटर्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडच्या संचालक मंडळानं टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचं टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे.
 

काय म्हटलंय कंपनीनं?
 

टाटा मोटर्स लिमिटेड (टीएमएल), टाटा कॅपिटल लिमिटेड (टीसीएल) आणि टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड (टीएमएल) यांच्या संचालक मंडळानं एनसीएलटी रिजीम स्कीमद्वारे टीएमएलचे टीसीएलमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली. या विलीनीकरणांतर्गत टीसीएल टीएमएलच्या भागधारकांना आपले इक्विटी शेअर्स जारी करेल, परिणामी टाटा मोटर्सकडे विलीन झालेल्या कंपनीत ४.७ टक्के हिस्सा असेल.
 

१२ महिन्यांचा कालावधी लागणार
 

नॉन-कोअर व्यवसायातून बाहेर पडून उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उत्पादनांवर आपला भांडवली खर्च केंद्रित करण्याच्या ऑटो कंपनीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने हा व्यवहार करण्यात आला आहे. टाटा मोटर्सनं दिलेल्या माहितीनुसार ही योजना सेबी, आरबीआय, एनसीएलटी आणि टीसीएल आणि टीएमएलचे सर्व भागधारक आणि कर्जदारांच्या मंजुरीच्या अधीन असेल आणि पूर्ण होण्यास ९-१२ महिन्यांचा कालावधी लागेल.
 

स्टॉक स्टेटस
 

टाटा मोटर्सच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी त्यात मोठी घसरण झाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी हा शेअर ९०४.१५ रुपयांवर बंद झाला. आदल्या दिवसाच्या तुलनेत हा शेअर ४.८८ टक्क्यांनी घसरला. व्यवहारादरम्यान हा शेअर ८५५.४५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. पण बुधवारी यात थोडी वाढ होऊन तो ९१७ रुपयांवर पोहोचला होता.
 

(टीप: यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: TATA Group Company tata motors finance company will end its existence tata motors share price up An important plan has been approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.