Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर 

TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर 

TCS सीईओ राजेश गोपीनाथ यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ते सध्या नोटीस पीरियडवर आहेत. त्यांचा नोटिस कालावधी १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:00 AM2023-03-22T10:00:39+5:302023-03-22T10:02:14+5:30

TCS सीईओ राजेश गोपीनाथ यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ते सध्या नोटीस पीरियडवर आहेत. त्यांचा नोटिस कालावधी १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.

tata group company tcs md ceo rajesh Gopinath to reunite with TATA as advisor Resigned from TCS after 23 years now offered for new post | TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर 

TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर 

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी (TCS) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच टीसीएसचे एमडी आणि सीईओ राजेश गोपीनाथ यांनी टाटा समूहासोबतचा आपला दीर्घ काळ सुरू असलेला प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु आता ते पुन्हा एकदा कंपनीसोबत नव्या भूमिकेत जोडले जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) आणि गोपीनाथ यांच्यासोबत चर्चाही झाल्याची माहिती समोर येत आहे. 

१५ सप्टेंबरला संपणार नोटीस पीरिअड
पीटीआयनुसार, टीसीएसच्या एमडी-सीईओ गोपीनाथ यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ते सध्या नोटीस पीरियडवर आहेत. त्यांचा नोटीस कालावधी १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. याआधीहीच टाटा समूहानं कंपनीसोबत दीर्घकाळ सेवा बजावलेल्या राजेश गोपीनाथ यांना कंपनीसोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यासोबत ॲडव्हायझरीच्या रोलसाठी चर्चा केल्याचं रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं नमूद करण्यात आलंय.

कोणताही प्लॅन नसल्याचं म्हटलं होतं
राजेश गोपीनाथ यांनी आपल्या TCS चा राजीनामा देताना सांगितलं होते की टाटा समूहात ॲडव्हायझरी पदासाठी त्यांची कोणतीही योजना नाही. पण रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ही भूमिका पूर्णपणे नाकारलीही नाही. आता गोपीनाथ हे नोटीस पीरिअडवर आहेत. अशा वेळी चंद्रशेखरन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करत असल्यानं ते पुन्हा कंपनीत रुजू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टाटा समूहाकडून यासंदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.

२२ वर्षांपासूनची साथ
२०१७ मध्ये चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांच्या जागी टीसीएसच्या एमडी आणि सीईओपदी राजेश गोपीनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. २०१३ मध्ये त्यांच्याकडे सीएफओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गोपीनाथ यांचा टाटा समूहाच्या कंपनीसोबतचा हा प्रवास २२ वर्षांपेक्षाही अधिक कालावधीचा आहे. दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर कंपनी त्यांना सोडण्याच्या स्थितीत नाही. गोपीनाथ यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.

Web Title: tata group company tcs md ceo rajesh Gopinath to reunite with TATA as advisor Resigned from TCS after 23 years now offered for new post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.