टाटा ग्रुपची कंपनी टायटनच्या (Titan) शेअर्समध्ये चांगली तेजी येण्याची शक्यता आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा हा आवडता शेअरमध्ये 40 टक्क्यांहूनही अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपनीचे शेअर्स 3000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. टायटन कंपनीचा शेअर 16 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2105.35 रुपयांवर ट्रेड करत होता. राकेश झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत मोठा गुंतवणूक आहे.
आऊटपरफॉर्म रेटिंगसह 3,000 रुपयांची टार्गेट प्राइस -
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॅक्वायरीने टायटन कंपनीच्या शेअर्सवर आऊटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी 3000 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. म्हणजेच, गुरुवारच्या शेअर प्राइसमधून कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांहून अधिकची वाढ होऊ शकते. या वर्षात आतापर्यंत, टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांपेक्षाही अधिकची घसरण झाली आहे. तर, गेल्या एका वर्षात 22 टक्यांहून ही अधिकचा परतावा दिला आहे.
टायटनमध्ये राकेश झुनझुनवालांचा मोठा वाटा -
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ३,५३,१०,३९५ शेअर्स अथवा ३.९८ टक्के एवढा हिस्सा आहे. तर, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 95,40,575 शेअर्स अथवा 1.07 टक्के एवढा हिस्सा आहे. म्हणजेच झुनझुनवाला कुटुंबाकडे टायटन कंपनीचे 4,48,50,970 शेअर्स अथवा 5.05 टक्के एवढा हिस्सा आहे.
(टीप - येथे केवळ शेअर संदर्भात माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)