Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tata Group: टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले'

Tata Group: टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले'

टाटाच्या जवळपास सर्वच कंपन्या मोठ्या नफ्यात आहेत. काही वर्षांपूर्वी तोट्यावर तोटा सहन करणारी टाटा मोटर्सही आता फायद्यात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 08:28 PM2023-01-23T20:28:29+5:302023-01-23T20:28:40+5:30

टाटाच्या जवळपास सर्वच कंपन्या मोठ्या नफ्यात आहेत. काही वर्षांपूर्वी तोट्यावर तोटा सहन करणारी टाटा मोटर्सही आता फायद्यात आहे.

Tata Group company Vistara turned profitable for the first time in 8 years; Air India 'starved' | Tata Group: टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले'

Tata Group: टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले'

टाटा ग्रुप हा देशाचा सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. टाटाच्या जवळपास सर्वच कंपन्या मोठ्या नफ्यात आहेत. काही वर्षांपूर्वी तोट्यावर तोटा सहन करणारी टाटा मोटर्सही आता फायद्यात आहे. असे असताना टाटाची एक मोठी कंपनी गेल्या ८ वर्षांपासून तोट्यात सुरु होती, एअर इंडिया ताब्यात काय आली या कंपनीने गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच नफा कमविला आहे. 

टाटा ग्रुपची एअरलाईन विस्ताराने सोमवारी याची माहिती दिली. कंपनीचा महसूल एक अब्ज डॉलरवर गेला आहे. तसेच या आर्थिक वर्षात एबिटा देखील पॉझिटिव्ह राहिला आहे. विस्तारामध्ये टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सची गुंतवणूक आहे. ही कंपनी 9 जानेवारी 2015 रोजी सुरु झाली होती. सध्या कंपनीच्या ताफ्यात 52 विमाने आहेत. 

विस्ताराचे सीईओ विनोद कन्नन म्हणाले की, हे वर्ष २०२२ कंपनीसाठी खूप चांगले आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीने आपले नेटवर्क आणि फ्लीट वाढवले ​​आहे. विस्ताराचे 5,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि दरमहा सुमारे 8,500 उड्डाणे चालविली जातात. डिसेंबर 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात त्याचा हिस्सा 9.2 टक्के होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. एअर इंडिया नुकतीच टाटा समूहात आली आहे. टाटा समूह आपला सर्व विमान व्यवसाय एका ब्रँडखाली आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे एअरएशिया इंडिया आणि विस्तारा या दोन्ही कंपन्या एअर इंडियामध्ये विलीन होतील. टाटा समूहानेही या तिन्ही विमान कंपन्यांना एकत्र आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

Web Title: Tata Group company Vistara turned profitable for the first time in 8 years; Air India 'starved'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा