Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले

टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:37 PM2023-05-22T19:37:03+5:302023-05-22T19:37:30+5:30

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

tata group created a new record earned rs 10 lakh crore in a year | टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले

टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले

टाटा ग्रुपने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. एका आर्थिक वर्षात कोणत्याही ग्रुपकडून 10 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवणारा हा देशातील पहिला ग्रुप ठरला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तिमाही आधारावर बोलायचे झाल्यास, रतन टाटांच्या अगदी जवळची असलेली टाटा मोटर्स ही टाटा ग्रुपमधील सर्व कंपन्यांना मागे टाकत एक लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवून देशातील 8वी कंपनी ठरली आहे. या लिस्टमध्ये टाटा ग्रुपमधील सर्वात मोठी कंपनी टीसीएसचे नावही नाही. 

टाटा ग्रुपच्या 14 प्रमुख लिस्टिड कंपन्या, ज्यात टाटा सन्सचा थेट भागभांडवल (डायरेक्ट इक्विटी हिस्सेदारी) आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10.07 ट्रिलियन रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये महसुलाचा हा आकडा 8.73 ट्रिलियन रुपये होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात 15.3 टक्के वाढ झाली आहे. तसे पाहता या कंपन्यांना गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी संयुक्त नफा बघायला मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये नफा 66,670 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2022 मधील 74,540 कोटी रुपयांपेक्षा 10.6 टक्क्यांनी कमी आहे. 

याच वर्षी टाटा स्टीलच्या मजबूत कामगिरीमुळे नफ्यात 156 कोटींची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर दुसरीकडे टाटा मोटर्सनेही विक्रम केला आहे. आत्तापर्यंत ग्रुपमधील कोणतीही कंपनी अगदी टीसीएस देखील हा विक्रम राखू शकलेली नाही. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत टाटा ग्रुपचा महसूल 105,932 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचा महसूल 59,162 कोटी रुपये होता. एका आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांचा महसूल पार करणारी टाटा मोटर्स ही ग्रुपमधील पहिली कंपनी ठरली आहे.

देशातील 8वी कंपनी ठरली टाटा मोटर्स
टाटा मोटर्स ही 1 लाख कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणारी देशातील 8वी दुसरी खाजगी आणि एकूण 8वी कंपनी ठरली आहे. सीएनबीसीच्या माहितीनुसार, सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एलआयसी, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांमध्ये 1 लाख कोटींहून अधिक तिमाही महसूल आहे. सध्या टाटा ग्रुपच्या सर्व लहान-मोठ्या कंपन्यांचा एक युनिट मानला तर 125 अब्ज डॉलरचा महसूल मिळत आहे. यामुळे तो जगातील 64 वा सर्वात मोठा ग्रुप बनला आहे.

Web Title: tata group created a new record earned rs 10 lakh crore in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.