Join us

320 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो टाटा ग्रुपचा 'हा' शेअर? राकेश झुनझुनवालांनी लावलाय मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:05 PM

स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, या शेअरची किंमत निगेटिव्ह मार्केट सेंटीमेंट्समुळे घसरली आहेत. कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये कसल्याही प्रकारची समस्या नाही.

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीचे नाव इंडियन हॉटेल्स (Indian Hotels) असे आहे. एप्रिल 2022 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) इंडियन होटल्सचा शेअर 268.95 रुपयांच्या ऑल-टाईम हायवर पोहोचला होता. यानंतर मात्र, इंडियन हॉटेल्सचे शेअर्स जवळपास 18 टक्क्यांनी घसरले आहेत. स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, इंडियन हॉटल्सच्या शेअरची किंमत निगेटिव्ह मार्केट सेंटीमेंट्समुळे घसरली आहेत. कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये कसल्याही प्रकारची समस्या नाही. एवढेच नाही, तर या शअरची किंमत भविष्यात 320 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणने आहे. 

320 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, इंडियन हॉटेल्सचा शेअर - स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की हॉस्पिटॅलिटी स्टॉकचा इमिडिएट सपोर्ट 200 ते 205 रुपयांच्या पातळीवर आहे. तसेच, 174 रुपयांच्या लेव्हलवर स्टॉकचा मजबूत सपोर्ट आहे. IIFL सिक्योरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट (रिसर्च) अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे, की हे केवळ करेक्शन अथवा प्रॉफिट बुकिंग आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सचा ट्रेंड आणि सायकल पॉझिटिव्ह आहे. यात आणखी तेजी बघायला मिळू शकते. 

तसेच, नव्या इनव्हेस्टर्ससाठी 210-215 रुपयांची लेव्हल एक चांगला बाइंग झोन असू शकते.  कुठलाही गुंतवणूकदार 174 रुपयांचा स्टॉप लॉस मेंटेन करत या लेव्हल्सवर कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतो. शॉर्ट टर्ममध्ये या कंपनीचा शेअर 260-275 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर, 275 रुपयांवर बंद झाल्यास, कंपनीचा शेअर 320 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :राकेश झुनझुनवालाटाटाशेअर बाजारशेअर बाजार