Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tata Group: टाटा ग्रुप मोठा बदल करण्याच्या तयारीत, लाखो लोकांवर होणार परिणाम; जाणून घ्या कंपनीचा प्लॅन

Tata Group: टाटा ग्रुप मोठा बदल करण्याच्या तयारीत, लाखो लोकांवर होणार परिणाम; जाणून घ्या कंपनीचा प्लॅन

माध्यमांतील वृत्तांनुसार, देशातील दिग्गज कंपनी टाटा ग्रुप अपल्या लिस्टेड कंपन्यांची संख्या कमी करू शकते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:59 PM2022-09-26T18:59:42+5:302022-09-26T19:00:04+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, देशातील दिग्गज कंपनी टाटा ग्रुप अपल्या लिस्टेड कंपन्यांची संख्या कमी करू शकते...

Tata Group is gearing up for a big change that will affect millions group making plan to merge listed companies know about the group plan here | Tata Group: टाटा ग्रुप मोठा बदल करण्याच्या तयारीत, लाखो लोकांवर होणार परिणाम; जाणून घ्या कंपनीचा प्लॅन

Tata Group: टाटा ग्रुप मोठा बदल करण्याच्या तयारीत, लाखो लोकांवर होणार परिणाम; जाणून घ्या कंपनीचा प्लॅन

टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकतेच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यावरून कंपनी लवकरच मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, देशातील दिग्गज कंपनी टाटा ग्रुप अपल्या लिस्टेड कंपन्यांची संख्या कमी करू शकते. 

15 वर येऊ शकते कंपन्यांची संख्या -
कंपनी येणाऱ्या काही दिवसांत लिस्टेड कंपन्यांची संख्या 29 वरून कमी करून 15 वर आणू शकते. यासंदर्भात कंपनीने विविध प्रकारचे प्लॅन तयार केले आहेत. मात्र, यासंदर्भात टाटा समूहाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. 

किती आहे ग्रुपचा रेव्हेन्यू?- 
टाटा ग्रुपच्या रेव्हेन्यूसंदर्भात बोलायचे झाल्यास यावेळी तो जवळपास 128 अब्ज डॉलरवर आहे. तर, कंपनीचे मार्केट कॅप 255 अब्ज डॉलर एवढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या कंपनी ग्रुपमध्ये ताळमेळ बसवण्याचे काम करत आहे. सध्या मार्केटमध्ये टाटा ग्रुपच्या एकूण 29 कंपन्या लिस्टेड आहेत. याच बरोबर, अनलिस्टेड कंपन्यांसंदर्भात बोलायचे झाल्यास ही संख्या जवळपास 5 डझनच्या जवळपास आहे. या कंपन्या अद्याप लिस्ट झालेल्या नाहीत. तसेच, जवळपास 100 सब्सिडरी कंपन्याही आहेत. ज्या ग्रुपच्या सोबतीने काम करत आहेत.

2017 पासून सुरू आहे मर्जर करायचं काम - 
गेल्या आठवड्यात कंपनीने टाटा ग्रुपचा सर्व स्टील बिझनेस टाटा स्टीलमध्ये मर्जर केला आहे. तसेच, टाटा कॉफीच्या कंपन्यादेखील कंझ्यूमर प्रोडक्ट्समध्ये मर्जर केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे कंपनी गेल्या 2017 पासूनच कंपन्या मर्जर करण्यावर काम करत आहे. 2017 मध्येच सीएमसीला टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये मर्ज करण्यात आले होते. तर, 2018 मध्ये कंपनीने आपला संपूर्ण एअरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेस टाटा एअरोस्पेस आणि डिफेन्समध्ये मर्जर केला होता. यामुळे कंपनी आगामी काळात टाटाचे इतरही काही प्रोजेक्ट्स मर्जर करू शकते.

Web Title: Tata Group is gearing up for a big change that will affect millions group making plan to merge listed companies know about the group plan here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.