Lokmat Money > बिझनेस न्यूज > यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड!

यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड!

देशात बाटलीबंद पाण्याचे मार्केट २० हजार कोटींपेक्षाही अधिक आहे. टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:14 PM2022-09-15T17:14:58+5:302022-09-15T17:16:53+5:30

देशात बाटलीबंद पाण्याचे मार्केट २० हजार कोटींपेक्षाही अधिक आहे. टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहेत. 

tata group proposes to buy stake in bisleri international know the business network and details | यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड!

यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड!

बिस्लेरी, भारतातील बाटलीबंद पाण्याचा सर्वात लोकप्रिय ब्रँडच्या सध्या विक्रीची चर्चा सुरू आहे. टाटा समूहाने रमेश चौहान यांच्या नेतृत्वाखालील बिस्लेरी इंटरनॅशनल या भारतातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड वॉटर कंपनीमध्ये भागभांडवल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनी या घडामोडीबाबत माहिती दिली आहे. त्यापैकी एकाने सांगितले की टाटा समूहाने बिस्लेरीला भागभांडवल खरेदीसाठी ऑफर दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यास, टाटा समूहाला एंट्री-लेव्हल, मिड-सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर श्रेणींमध्ये येण्याची संधी मिळेल.

ही डील टाटा समुहाला रिेटेल स्टोअर्स, केमिस्ट चॅनल्स, इन्स्टीट्यूशनल चॅनल्स, हॉटेलसह रेडी गो-टू मार्केट देईल. टाटा समुहाचं चाचा कंझ्युमर बिझनेस सध्या रणनीतिक अधिग्रहणाची संधी शोधत आहे. टाटा समुहाचा कंझ्युमर बिझनेस स्टॉरबक्स कॅफे ऑपरेट करण्याशिवाय टेटली चाय, एट ओ क्लॉक कॉफी, सोलफुल सीरिअल्स, मीठ आणि डाळ यांची विक्री करते. न्यूरिशको अंतर्गत बाटलीबंद पाण्याचा व्यवसायही आहे.

बिसलेरीचा बिझनेस नेटवर्क
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बिस्लेरीकडे 122 पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत. त्याचे संपूर्ण भारतात 5,000 ट्रकसह 4,500 पेक्षा जास्त वितरक नेटवर्क आहे. देशातील पॅकेज्ड वॉटर मार्केटची किंमत 20,000 कोटींहून अधिक आहे. यातील 60 टक्के असंघटित आहेत. बिस्लेरीचा संघटित बाजारपेठेतील हिस्सा सुमारे 32 टक्के आहे. मिनरल वॉटर व्यतिरिक्त, बिसलेरी इंटरनॅशनल प्रीमियम हिमालयन स्प्रिंग वॉटर देखील विकते.

का होऊ शकते विक्री?
रमेश चौहान यांनी 1993 मध्ये थम्स अप, लिम्का आमि गोल्ड स्पॉटसारखे प्रतिष्ठीत ब्रँड कोका कोलाला 60 मिलियनला विकले होते. थम्स अप  देशातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड बनला आहे. काही वृत्तांनुसार बिसलेसीचे मालक रमेश चौहान यांच्या उत्तराधिकारी योजना कंपनीमध्ये हिस्सा कमी करण्याचं कारण आहे. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. जर आपण आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला तर कोणत्याही भारतीय ब्रँडला पुढे नेण्यासाठी निवड करू असं चौहान यांनी यापूर्वीच सांगितलं.



बिस्लरीचा इतिहास
सुरुवातीला बिसलेरी ही एक फार्मास्युटिकल कंपनी होती, जी मलेरियाच्या औषधांची विक्री करत होती. याचे संस्थापक इंटलीचे व्यावसायिक फेलिस बिसलेरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची फॅमिली डॉक्टर रॉसीनं बिसलेरीला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. भारतात डॉक्टर रॉसी यांनी वकिल खुशरू संतकू यांच्यासोबत मिळून बिसलेरी लाँच केली. त्यावेळी बाटलीबंद पाणी विकणं हे वेडेपणापेक्षा काही कमी नव्हतं. बाटलीबंद पाणी विकत घेऊन कोण खरेदी करेल अशी धारणा तेव्हा होती. परंतु त्यांनी भविष्याकडे पाहिलं. 1965 मध्ये त्यांनी ठाण्यात पहिला बिसलेरी वॉटर प्लांट सुरू केला.

भारतातील विस्ताराची कहाणी
बिसलेरीनं भारतीय बाजारपेठेत मिनरल वॉटर आणि सोडा या प्रोडक्टसोबत एन्ट्री घेतली. त्यावेळी सामान्य व्यक्तीनं बाटलीबंद पाणी विकत घेणं तसं अशक्य होतं. परंतु श्रीमंतांमध्ये हे लोकप्रिय झालं. सुरूवातीला केवळ फाईव्ह स्टार हॉटेल आणि महागड्या रेस्तराँमध्ये बिसलेरीची बाटली उपलब्ध होती. परंतु त्यानंतर यात एक मोठं वळण आलं. डॉ. रॉसी यांनी हा व्यवसाय पारले कंपनीच्या रमेश चौहान यांना विकला. 1969 मध्ये बिसलेरी पारले कंपनीनं विकत घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा व्यवसाय 4 लाख रूपयांमध्ये झाला. त्यानंतर चौहान यांना प्रत्येक घरापर्यंत बिसलेरी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वप्रथम बिसलेरी रेल्वे स्टेशनवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

 

Web Title: tata group proposes to buy stake in bisleri international know the business network and details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.