Join us

रतन टाटा 'या' दिग्गज कंपनीतील संपूर्ण ७७९०० शेअर्स विकणार, येतोय IPO; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 5:03 PM

शेअर बाजारात लवकरच आणखी एका मोठ्या कंपनीच्या IPO येण्याच्या तयारीत आहे.

FirstCry IPO: शेअर बाजारात लवकरच आणखी एका मोठ्या कंपनीच्या IPO येण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म FirstCry ची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडचा (Brainbees Solutions Limited) IPO येत आहे. यासाठी कंपनीनं सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. या कंपनीत अनेक दिग्गजांचे मोठे स्टेक आहेत. रतन टाटा यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, रतन टाटा फर्स्टक्रायमधील त्यांचे सर्व 77,900 शेअर्स विकणार आहेत.

या दिग्गजांचीही भागीदारीसेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, IPO मध्ये 1,816 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि कंपनीच्या भागधारकांद्वारे 5.44 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) आणले जातील. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टीपीजी, न्यू क्वेस्ट एशिया, एसव्हीएफ फ्रॉग (Cayman) लिमिटेड, अॅप्रिकॉट इनव्हेस्टमेंट, वॅलेंट मॉरिशस, टीआयएमएफ, थिंक इंडिया अपॉर्च्युनिटिज फंड, श्रोडर्स कॅपिटल आणि पीआय अपॉर्च्युनिटिज हे ऑफर फॉर सेल अंतर्गत आपले शेअर्स विकतील. डीआरएचपी फाइलिंगनुसार, ऑटोमोबाईल निर्माता M&M ब्रेनबीज सोल्युशन्समधील 0.58 टक्के स्टेक किंवा 28 लाख शेअर्स विकणार आहे, तर सॉफ्टबँक ई-कॉमर्स क्षेत्रातील आपला हिस्सा कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत 2.03 कोटी शेअर्स विकणार आहे.कंपनीचा व्यवसायकंपनी आयपीओमधून उभारलेल्या पैशाचा वापर भारतात तसंच सौदी अरेबियामध्ये नवीन दुकानं आणि गोदामं उघडण्यासाठी करेल. याशिवाय जमा झालेली रक्कम मार्केटिंग उपक्रमांसाठी वापरली जाईल. मात्र, शेअरच्या किमतीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. FirstCry आई आणि मुलांशी संबंधित उत्पादनांची विक्री करते.

टॅग्स :रतन टाटामहिंद्रा