Lokmat Money > बिझनेस न्यूज > TaTa Circular For Air India: टाटाचे झाले तरी एअर इंडियाचे कर्मचारी सुधरेणात; लेटमार्कमुळे अ‍ॅक्शनमध्ये कंपनी

TaTa Circular For Air India: टाटाचे झाले तरी एअर इंडियाचे कर्मचारी सुधरेणात; लेटमार्कमुळे अ‍ॅक्शनमध्ये कंपनी

Air India Employees Behavior: एअर इंडिया 27 जानेवारी रोजी टाटा समूहाकडे सुपूर्द करण्यात आली आणि कंपनीचे मेकओव्हर सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी, एअर इंडियाच्या केबिन क्रू युनियनने केबिन क्रूसाठी बीएमआय आणि वजन तपासणी अनिवार्य करण्याच्या परिपत्रकावर आक्षेप घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:52 PM2022-02-13T20:52:09+5:302022-02-13T20:52:31+5:30

Air India Employees Behavior: एअर इंडिया 27 जानेवारी रोजी टाटा समूहाकडे सुपूर्द करण्यात आली आणि कंपनीचे मेकओव्हर सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी, एअर इंडियाच्या केबिन क्रू युनियनने केबिन क्रूसाठी बीएमआय आणि वजन तपासणी अनिवार्य करण्याच्या परिपत्रकावर आक्षेप घेतला होता.

TaTa group roll out Circular For Air India employees in action due to the latemark | TaTa Circular For Air India: टाटाचे झाले तरी एअर इंडियाचे कर्मचारी सुधरेणात; लेटमार्कमुळे अ‍ॅक्शनमध्ये कंपनी

TaTa Circular For Air India: टाटाचे झाले तरी एअर इंडियाचे कर्मचारी सुधरेणात; लेटमार्कमुळे अ‍ॅक्शनमध्ये कंपनी

एअर इंडिया आता टाटा ग्रुपची झाली आहे. यामुळे लोकांच्या या कंपनीकडून बदलाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पहिल्याच फ्लाईटवेळीच टाटा ग्रुपने लेटलतिफी नको असे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना समजावले होते. तरी देखील वर्षानुवर्षे सवय झालेल्या एअर इंडियाच्या अंगवळणी काही टाटाची शिस्त लागत नाहीय. यामुळे एअर इंडियाच्या लेटलतिफगिरीवर आळा घालण्यासाठी टाटाने केबिन क्रूसाठी नवीन अॅडवायझरी जारी केली आहे. 

कंपनीने एअर इंडियाची ऑन टाईन परफॉर्मन्स सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियमावली जारी केली आहे. एअर इंडिया 27 जानेवारी रोजी टाटा समूहाकडे सुपूर्द करण्यात आली आणि कंपनीचे मेकओव्हर सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी, एअर इंडियाच्या केबिन क्रू युनियनने केबिन क्रूसाठी बीएमआय आणि वजन तपासणी अनिवार्य करण्याच्या परिपत्रकावर आक्षेप घेतला होता. एअर इंडियाने 20 जानेवारी रोजी एका संप्रेषणाद्वारे सांगितले होते की केबिन क्रूच्या प्रत्येक सदस्याची आता प्रत्येक तिमाहीत बीएमआय आणि वजन तपासणी केली जाईल.

1. केबिन क्रूला गणवेशाशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. या अॅडव्हायझरीमध्ये केबिन क्रूला किमान दागिने घालण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून कस्टम क्लिअरन्स आणि सुरक्षा तपासणीमध्ये विलंब होणार नाही.
2. केबिन क्रूने ड्युटी फ्री दुकानात जाऊ नये. इमिग्रेशन आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर क्रू मेंबर्सनी बोर्डिंग गेटकडे जावे.
3. केबिन सुपरवायझरने सर्व केबिन क्रू केबिनमध्ये उपस्थित असल्याची खात्री करावी. प्रवाशांपूर्वी किंवा त्यांना देत असताना क्रूने काहीही खाऊ किंवा पिऊ नये. यासोबतच प्रवाशांचे बोर्डिंग लवकरात लवकर व्हावे.
4. अनबोर्डिंग केल्यानंतर, केबिन क्रूने पीपीई किटमधील फक्त त्याच वस्तू परिधान कराव्यात, ज्या नवीनतम परिपत्रकात अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
5. केबिन पर्यवेक्षकाने दरवाजे बंद करण्यास उशीर करू नये.

Web Title: TaTa group roll out Circular For Air India employees in action due to the latemark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.